Post Views: 78
नांदेड – जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील विविध संवर्गातील पदावरील कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे अधिकार काढून घेण्यात आल्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी ७ आॅगस्ट रोजी काढलेल्या आदेशान्वये कळविण्यात आले आहे. पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना असलेले शिक्षकांच्या निलंबनाचे अधिकार काढून घेण्यात यावे अशा आशयाचे मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले होते. त्यामुळे शिक्षक सेनेच्या मागणीला यश मिळाल्याचे मत जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांनी व्यक्त केले आहे.
केंद्रप्रमुख, माध्यमिक शिक्षक, अंदाजपत्रित मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, प्राथमिक पदवीधर, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, चित्रकला शिक्षक, शारिरीक शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक आदी शिक्षण संवर्गातील गटांतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा ( शिस्त व अपिल) नियम १९६४ चे भाग २ मधील ३ प्रमाणे निलंबित करण्यापर्यंतचे अधिकार जिल्ह्यातील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांना २३ जुलै २०१५ पासून प्रदान करण्यात आले होते. या अधिकाराचा दुरुपयोग होत असल्याबाबतची बाब शिक्षक सेनेने मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना एका निवेदनाद्वारे लक्षात आणून दिले होते. आता या आदेशाद्वारे सदरील अधिकार रद्द करण्यात आले आहेत. तसेच तात्पुरती वेतनवाढ थांबविण्याचे आणि वयाचे ५० वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना संगणक परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याचे अधिकारही काढून घेण्यात आले आहेत.
या निर्णयाचे स्वागत राज्यउपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण , मराठवाडा सहसचिव विठ्ठलराव देशटवाड , मराठवाडा संघटक – श्रीरंग बिरादार , जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, जिल्हासरचिटणीस रवि बंडेवार , जिल्हाकार्याध्यक्ष मनोहर भंडेवार , जिल्हाकोष्याध्यक्ष गंगाधर कदम , जिल्हामार्गदर्शक- पुरुषोत्तम मोतेवार , बळीराम पा.शिंदे , चंद्रकांत तम्मलवार , जयवंत हंगरगे सर , शिवाजी पा.बामणीकर , जिल्हा उपाध्यक्ष- बालाजी राजूरवार , अविनाश चिद्रावार , गंगाधर ढवळे , शंकर हामंद , सुकन्या खांडरे , मुस्तफा शेख जुनीपेन्शन जिल्हा समन्वयक गोविंद आलेटवाड , जिल्हासंघटक – संजय मोरे , बालाजीराव पेटेकर , प्रकाश कांबळे , कृष्णा माने , शिवानंद निलगीरवार , देविदास शिंदे , विलास पोतुलवार , आकाश राजूरे , सहसचिव – सचिन रामदिनवार , बालाजी लोहगावकर , जिल्हासमन्वयक अनिरुद्ध सिरसाळकर , सह समन्वयक बालाजी भांगे , महिला संघटक – ज्योती शिंदे , पंचफुला वाघमारे , शिवकन्या पटवे , शोभा गिरी , मेघा धानोरकर , तालुका अध्यक्ष बिलोली – बालाजी गेंदेवाड , अर्धापुर – मठवाले बस्वराज , मुखेड – राम जाधव , हि.नगर – रामदास देशमुख , किनवट – लोखंडे सर नायगाव – देविदास जमदडे , देगलूर – सुर्यकांत पाटील , मुदखेड – बोईनवाड सर , लोहा – आंनंदा पवार , धर्माबाद – संजय हामंद , तालुका पदाधिकारी राजाराम कसलोड , शिवराज गागिलगे , इरेशाम झपलकर , बालाजी किसवे , मुरलीधर राजूरकर , पांडूरंग अंकलवार लक्ष्मण सिंगनवाड , दत्ता पोले , आनंदा सुर्यवंशी , दत्ता पेंढारकर , लहू पंदलवाड , संतोष घटकार , बनसोडे सर , मिरेवाड सर , जगदीश बोडके आदींनी केले आहे.