(दि.०५ आॅगस्ट २०२३ गुरुवर्य प्रा.डाॅ.बदने सरांचा वाढदिवस.त्या निमित्त केलेला हा शब्दप्रपंच.)
प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला व बुद्धिमत्तेला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण काम शिक्षकच करत असतात. घरामध्ये आई- वडील विद्यार्थ्यांचे पहिले शिक्षक जरी असले तरी सुद्धा शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांचे योगदान ही नसे थोडके.
बदने सरांचे व्यक्तिमत्व,बोलण्याची पद्धत, प्रत्येक विद्यार्थ्याला समजून घेण्याची लकब आणि महत्वाचे म्हणजे दृष्टांतसह एखादा विषय समजून सांगण्याची पद्धत हे गुण वैशिष्ट्ये वाखाणण्याजोगी आहेत. सरांच्या स्वभाव मनमोकळा आहे.त्यामुळे मला सरांबध्दल अतिव आदर आहे.
सर्व विद्यार्थ्यांकडे व पालकांकडे एक समान नजरेने बघण्याचा दृष्टिकोण सरांचा आहे.कोणामध्ये भेदभाव करताना त्यांना कधीही मी पाहिले नाही. अतिशय प्रेमळ आणि दयाळू पणा त्यांच्यात दिसतो.ते नैहमी विद्यार्थ्यांची काळजी घेताना दिसतात.त्यांच्या मनात विद्यार्थ्यांबध्दल महत्त्वाचे स्थान आहे.आपल्या भारतात प्राचीन काळापासून शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते अत्यंत आदराचे असलेले बघायला मिळत आलेले आहे.आणि भारतीय संस्कृती मध्ये शिक्षकाला देवाचा दर्जा दिला गेला आहे.आचार्य देवो भव असे त्यामुळेच म्हणतात.गुरू चांगला मिळाला की शिष्याचे भले व्हायला वेळ लागत नाही.साहित्य व भाषणाच्या क्षेत्रात नव्याने काम करणाऱ्या अनेकांना सर तन्मयतेने मार्गदर्शन करत असतात.त्यांनी विपुल ग्रंथ लेखन केले आहे.अनेक व्याख्याने दिली आहेत व आज ही देत आहेत.आई,वडील,पत्नी या विषयावर ते खूपच छान बोलतात.त्यांचे व्याख्यान ऐकणे श्रोत्यांसाठी एक पर्वणीच असते.त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.विद्यापीठातील उत्कृष्ट प्राध्यापक म्हणुन ही त्यांचा सन्मान झालेला आहे.हे आम्हा नांदेडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.एक व्यक्ति मनावर घेतला तर काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे सर आहेत.एका तांड्यावरील महाविद्यालयात काम करून नावलौकिक मिळविणे एवढे सोपे नाही पण त्यांनी ते अथक प्रयत्नातुन साध्य केले आहे.त्यांचे विविध पुस्तकांतून व पेपरमधुन विपुल लेखन झाले आहे.अनेक विद्यार्थी पीएच.डी.झाले आहेत.
पारिवारिक बाबतीत ही सर अत्यंत समाधानी आहेत.त्यांच्या सौभाग्यवतीं दैवाशाला यांचे त्यांना नेहमीच सहकार्य लाभते.वारकरी संप्रदायाचा संस्कार सरांवर झाला आहे त्या मुळे ते मद्य व मांस या पासून कोसो दूर आहेत.त्यांचा सहवास हा चंदनाप्रमाणे सूगंध देणारा आहे.राजहंसाप्रमाणे गुण घ्यायचे व दोष सोडून द्यायचे असा स्वभाव सरांचा आहे.महाराष्ट्रभर सरांचा मित्र परिवार मोठा आहे.आम्हाला ही कधी कधी त्यांचा सहवास लाभतो हे आमचे भाग्य आहे.ते माणूस रूपातील देवरूप आहेत. आमचे आदर्श प्रा.डाॅ. रामकृष्ण बदने सरांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
या निमित्ताने त्यांना उदंड आयुष्य व आरोग्य लाभो असी ईश्वर चरणी प्रार्थना करून मी माझा शब्दप्रपंच थांबविते.
प्रा.सारिका बकवाड
नांदेड