कंधार : प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील भोजूचीवाडी येथील शेत शिवारात जादूटोणा करत गुप्तधन शोधणाऱ्या टोळीचा गावकऱ्याच्या मदतीने कंधार पोलिसांनी पर्दाफाश केला. शेतात अघोरी प्रकार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत ७ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडून मोबाईल व कार हस्तगत करण्यात आली होती. यातील ६ जनावर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूह उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 नुसार कलम 3 व भादवि कलम 34 नुसार गुन्हे दाखल केले आहेत.
कंधार तालुक्यातील भोजूचीवाडी शिवारात नामदेव तुकाराम देवकते रा. भोजूचीवाडी यांच्या शेतात ७ रोजी पहाटे २ च्या सुमारास आघोरी पुजा चालु असल्याची गोपनिय माहिती गाववाल्यांना लागली त्यांनी लगेच ११२ नंबर डायल करून कंधार पोलीस ठाण्याला कळवली. पोलीस त्या ठिकाणी येईपर्यंत गावकऱ्यांनी दोन मांत्रिक व दोन मिस्त्री कामगार यांना ताब्यात घेतले होते. पोलिस त्या ठिकाणी आले व त्यांना ताब्यात घेतले. त्या ठिकाणी लिंबु, नारळ, अगरबत्ती, हळद, कुंकू लावून पूजा करुन, मंत्रपाठ करुन त्या ठिकाणी खोदकाम करुन खड्डा खोदण्यात आला. पोलिसांनी तपासचक्र फिरवली आणि गुप्त धनाकरीता अघोरी कृत्य करणार्या आत्तापर्यंत ७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यातली ६ जनावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेमध्ये अनिल कामाजी कावळे रा. बहाद्दरपुरा, शेतमालक नामदेव तुकाराम देवकते रा. भोजूचीवाडी, धन दिसणारा मांत्रिक देवदास संभाजी नागठाणे रा. कलंबर व छायाबाई राजू जोंधळे रा. संभाजीनगर कंधार, मिस्त्री म्हणून खोदकाम करणारे संजय जळबाजी पुय्यड रा. वडगाव ता. जि. नांदेड, मुखतार अब्दुल खादर शेख रा. इंदिरानगर लोहा. या ६ जनावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एक अनील कामाजी कावळे आश्रम शाळेवर लॅब असिस्टंट या पदावर कार्यरत आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर हे करीत आहेत.