नांदेड ; प्रतिनिधी
नांदेड व परभणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने SDRF च्या मदतीने यशस्वी केले बचाव कार्य .
परभणी जिल्हयातील मानवत तालुक्यात मौजे उक्कलगांव या गावातील गोलु ( सोहम सुरेश उक्कलकर ) हा पाच वर्षाचा मुलगा आजी आजोबा सोबत शेतात गेला होता. शेतामध्ये जुना बोअरवेल उघडा होता. खेळता खेळता नकळत गोलु त्या उघडया बोअरवेल पडला. सदर घटना दि.९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.३० च्या दरम्यान घडली आजी आजोबांनी ओरडा ओरड केल्यामुळे आसपासच्या शेतातील शेतकरी जमा झाले त्यांनी सदर घटनेबाबत पोलीसांना माहिती दिली. स्थानीक पोलीसासह जिल्हयातील महसूल प्रशासन,पोलीस प्रशासन त्या बालकास काढण्यासाठी जेसीबीच्या मदतीने प्रयत्न करत होते परंतु मार्ग निघत नव्हता.
नांदेड जिल्हयात राज्य आपत्ती प्रतिसाद दल SDRF धुळे ची एक तुकडी १५ जुलै २०२३ पासून तैनात आहे. सदर तुकडीच्या माध्यमातुन जुलै महिन्यात नांदेड जिल्हयात झालेल्या पावसामुळे पुरस्थितीत अडकलेल्या अर्धापुर,मुदखेड,माहुर तालुक्यातील जवळपास २७ शेतकरी, नागरीकांना सुखरुप वाचविले आहे. सदर तुकडी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड यांच्या अधिनस्त आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी श्री अभजिीत राऊत हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष असून निवासी उपजिल्हाधिकारी श्री महेश वडदकर हे कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतात या प्राधिकारणा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून श्री किशोर कु-हे हे कामकाज पाहत आहेत.
नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास परभणी येथील सदर गोलु च्या घटनेबाबत दुपारी ३ च्या आसपास माहिती मिळाली लगेचच प्राधिरणाकडून नांदेड येथील SDRF तुकडीला सर्तक राहण्याच्या सुचना देण्यात आल्या. व मा. जिल्हाधिकारी नांदेड अभिजीत राऊत यांनी तात्काळ सदर तुकडीला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नांदेड श्री किशोर कु-हे यांच्या सोबत जाऊन परभणी जिल्हयातील मानवत तालुक्यात बोअरवेल मध्ये अडकलेल्या बालकाचा बचाव करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार तुकडीने लगेच नांदेड वरुन परभणीकडे प्रस्थान करुन ५.३० च्या दरम्यान त्या ठिकाणी पोहचली व रात्री ७ वा.च्या दरम्यान अत्यंत कौशल्यतेने दीड तासात सदर बालकाचा बचाव केला. या कामी अभिजीत राऊत जिल्हाधिकारी नांदेड व महेश वडदकर निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कु-हे व SDRF च्या टीमशी व परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व प्रशासनाशी सातत्याने संर्पकात राहून होते. SDRF च्या या बचाव करणा-या तुकडीचे कमांडर मनोज परीहार ( पो.नि.) होते त्यांच्यासह तुकडीतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी या बचाव कार्यालय तत्परतेने भुमीका पार पाडली.या सह परभणीतील पोलीस प्रशासन व स्थानीक प्रशासनानेही योग्य तो बंदोबदस्त ठेवून सहकार्य केले.
नांदेड परभणी या दोन जिल्हयातील प्रशासकीय यंत्रणेच्या योग्य समन्वायतून गोलू चे प्राण वाचले व तो सुखरुप बोअरवेलच्या बाहेर काढला गेला या बद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे. तसेच नांदेड जिल्हयात ज्यांच्याकडे अशा उघडया बोअरवेल असतील त्यांनी त्या व्यवस्थीत झाकून आवश्यक ती सुरक्षीतता त्या बोअरवेलसाठी करावी जेणे करुन अशा घटना आपल्या जिल्हयात होणार नाहीत., असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नांदेडच्या वतीने करण्यात येत आहे.