कंधार ; प्रतिनिधी
पाणीपुरवठा रोजदारी कर्मचान्यांचे १० महिन्याचे थकीत वेतन रखडल्यामुळे ४ ऑगस्टपासून कामबंद केले आहे.माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी सदरील उपोषण स्थळी भेट दिली .
कंधार नगर परिषद हद्दीतील नागरिकांना पाण्याची सोय व्हावी यासाठी जवळपास २५ कोटी रुपये
खर्च करुन उर्ध्व मानार धरण लिंबोटी येथून पाणीपुरवठा योजना घेण्यात आली. पण ही योजना अद्यापही पूर्णपणे कार्यान्वित झाली नाही.. पाणीपुरवठा कर्मचारी यात काम करतात. या कर्मचान्यांचे जुन २०२१ ते डिसेबर २०२१ चे ७ महिन्याचे, २०२२ मधील ३ महिण्याचे असे १० महिन्याचे वेतन थकले आहे.
वेळोवेळी नगर परिषदेचे पाणी पुरवठा रोजंदारी कर्मचारी या अगोदर ही ११ महिन्याचे थकीत वेतन रखडले असल्यामुळे उपोषणाला बसले होते. त्यावेळी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी विनंती करूनही वेतन होत नसल्याने मुख्याधिकारी व संबंधित कर्मचारी या कर्मचाऱ्यांनी कामबंद करीत असल्याचे निवेदन कंधार न.प.चे मुख्याधिकारी यांना दिले होते. त्यावेळी
चर्चा करून मार्ग काढला त्यावेळी दर महिन्यांच्या पगारी वेळेस दोन महिन्याची पगार करून चकीत वेतन देण्याचे आश्वासन दिले होते पण त्या आश्वासनावर पालिका ठाम राहिली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा रोजंदारी कर्मचाऱ्यांनी ४ रोजी पासून काम बंद करण्याचा निर्णय घेतला. ९ तारखेपर्यंत थकीत वेतन मिळाले नाही तर १० ऑगस्ट पासून पालिकेसमोर उपोषण करणार असल्याचे सांगीतले होते.
त्यानुसार आज उपोषण चालू झाले .या निवेदनावर सय्यद अली, बालाजी निकम, परमेश्वर चौधरी, राहुल कदम, ज्ञानेश्वर चौधरी, कल्याण वाघमारे, बालाजी घोडजकर, विल केले, नागेश पवार, शिवाजी लुंगारे, नारायण लुंगारे, हनुमंत लुंगारे, केदार बोरकर, अनिल हकदळे, बळीराम कंधारे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत .