मलाही आनंदी रहायचय

माझ्या वाचकाने मला विचारलेला प्रश्न.. मॅडम मला तुमच्यासारखं आनंदी रहायचय काय करु ??..
मित्रांनो तुमच्याच प्रश्नात तुमचं उत्तर दडलय.. जो दुसऱ्याला आनंदी पाहु शकतो तो कायम आनंदीच रहातो मी तेच करते.. सगळ्यात आधी आपण आपल्यावर प्रेम करायचं आणि आपल्याला कसं आनंदी ठेवता येइल ते पहायचं .. काही गोष्टी एका क्षणात सोडताही यायला हव्यात जशा त्या एका क्षणात जोडताही यायला हव्यात..
माझ्या घरातील कालचच उदाहरण सांगते.. माझी मुलगी मुंबईत आणि आम्ही पुण्यात.. सचिन तिला फोनवर सांगत होता , सेव्हींग करायची सवय लाव , आम्ही तुझ्यासाठी करतोय म्हणजे तु बेफीकीर राहु नकोस वगेरे.. तो बाप म्हणुन त्याच्या जागी योग्य आहे.. मी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होते. फोन ठेवल्यावर त्याला म्हटलं , चिडचिड करून काहीही उपयोग नाही.. तुला जे जमेल ते तिच्यासाठी कर .. बाकी तिचं ती पाहील फक्त आपण समजावुन सांगायचा प्रयत्न करुयात..
एक मिनीटभर मला त्या संभाषणाने ताण आला आणि हरीनाम घेत मी त्यातुन स्वतःला बाजूला करुन घेतलं कारण माझा प्रत्येक क्षण हा फक्त माझा आहे.. ना तो मुलीच्या सेव्हींगवर अवलंबून आहे ना नवऱ्याच्या चिडचिड करण्यावर..
नात्याच्या गुंतागुंतीत आणि उद्याचं काय होइल यात आजचा क्षण जगायचा राहुन जातो आणि परिणामी आपण आनंदाला मुकतो.. भौतिक सुखापासुन कायमच अलिप्त रहात असल्याने मी कायमच आनंदी रहाते.. मुलीसाठी करणं हे माझं कर्तव्य आहे कारण तिला या जगात मी आणलय आणि माझं मुलीला काहीही करावं लागु नये म्हणुनही मीच प्रयत्न करायचा आहे कारण व्यायामाने शरीर आणि चांगल्या विचाराने मन सुदृढ ठेवलं तर मुलांनी आपल्यासाठी काही करावी ही वेळच येत नाही.. अपेक्षा भंगाचं दुख सगळ्यात मोठं त्यामुळे फक्त प्रेम आणि आनंद द्या त्याच्या परतीची अपेक्षा ठेवुच नका.. मी तर म्हणते या जगात दुखच नाही फक्त सुखच आहे.
जसा अर्जुन सर्वस्वी कृष्णावर विसंबून होता तसं आपण राहायला काय हरकत ??.. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन..
कोणासाठी काहीही केलेलं विसरुन जा पण दुसऱ्याने आपल्यासाठी काय केलय याची जाण असुद्या..
Dear Readers.. Be Happy and Healthy forever

सोनल गोडबोले.. लेखिका
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *