शाकुंतल’ एक्सलन्सच्या विद्यार्थीनी झाल्या मन्याड-गोदा खोर्‍यातील रक्षाबंधनाच्या स्फूर्तिदायक उपक्रमात सहभागी!

नांदेड ; प्रतिनिधी

नंदीग्राम नगरीतील नानाविध उपक्रमाने नांदेड शहरच नव्हे जिल्हाभर अल्पावधीत नावारुपास आलेले ज्ञानालय म्हणजे शाकुंतल एक्सलन्स नांदेड ही शाळा मन्याड-गोदा खोर्‍यातील रक्षाबंधन निमित्ताने दरवर्षीच गेली दहा वर्षापासून अखंडित पणे ३३३३ राख्या अन् ३३३३ सदिच्छापत्रा सोबत १५ फुटाची महाराखी पाठविण्याचा हा उपक्रम सुलेखनकार गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार वतीने दहा वर्षांपासून राबविला जातो. शाकुंतल शाळा ही दरवर्षी हा उपक्रमात सहभागी होते.यंदा ही या उपक्रमात शाळा सहभागी होतांना चिमुकल्या भगिनींनी विद्यार्थीनींनी आपल्या हस्तकला कौशल्यातून ३५० राख्या स्वतःच्या तयार करून सदिच्छापत्र सुंदर लिहून सहभागी झाल्या.

 

या देशभक्तीने ओतप्रोत राष्ट्रीय कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गिरीषजी जाधव साहेब यांची उपस्थित ठळक होती. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना भारतीय सण रक्षाबंधनचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव सौ. सिंधूताई पावडे मॅडम, कोषाध्यक्षा कु. पुजा जाधव मॅडम,आदरणीय प्राचार्य सदाशिवराव टाकले सर,आदरणीय उपप्राचार्या भुवना बार्शीकर, पर्यवेक्षक प्रशांत ढोबळे, श्रीनिवास बिरादार,शिल्पा एमेकर सहित शाळेतील शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वृन्द उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *