अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )
गोर बंजारा साहित्य संघ आयोजित तिसरे एक दिवशीय वसंतवादी साहित्य संमेलन आज शनिवार दि १२ आँगस्ट २३ रोजी राष्ट्रभाषा कार्यालय, वोक्हार्ट हाँस्पिटलच्या मागे, अंबाझरी रोड, नागपूर येथे पार पडणार आहे.
या संमेलनास उद्घाटक म्हणून मा नितीन सरदार, स्वागताध्यक्ष म्हणून श्रीकांत राठोड तर अध्यक्षपदी प्रा जयसिंग जाधव असणार आहेत. सकाळी ०७ : ३०वाजता विधानभवन ते कार्यक्रमस्थळी ग्रंथदिंडी निघणार आहे. ०९ : ३०वाजता ध्वजारोहण तर ०९ : ३०ते १० : ००वाजता मोतिराज राठोड ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन होणार आहे. १० : ३०वाजता आत्माराम कनीराम राठोड उर्फ डँनियल राणा विचारमंचावर उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
उद्घाटन सत्रात डॉ दत्तराम राठोड, पोलिस उपायुक्त, अमरावती; प्रा डॉ सुरेंद्र पवार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर; मा पिरूसिंग राठोड, नागपूर; मा सुरेश राठोड, हास्यकवी काटोल; मा विजय राठोड, हिंगणा; इ मान्यवरांचा तर कु संस्कृती वि पवार, कु सलोनी ना चव्हाण, व तेजस प्र चव्हाण या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे.
दुपारच्या सत्रात ०१ : ०२प्रथम परिसंवाद होणार आहे. विषय आहे संविधानाच्या ध्येयातील भारताच्या जडणघडणीत नाईक साहेबांचे योगदान, सत्राध्यक्ष आहेत प्रा रतनकुमार राठोड.०२ ते ०२ : २०दरम्यान उपसंपादक वाशीम, धनंजय कपाळे यांची प्रकट मुलाखत पत्रकार अनिल राठोड, मानोरा हे घेणार आहेत. यानंतर ०२ : २०ते ०४ : ००पर्यंत मा सुरेश राठोड, काटोल यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन रंगणार आहे. सुत्रसंचालक संमोहनतज्ञ अनिल राठोड आहेत. यात पी के पवार, नामदेव राठोड, सुरेश राठोड, विशेष पवार, ताराचंद चव्हाण, सुभाष चव्हाण, मनोहर चव्हाण आणि अनिल जाधव सहभागी होणार आहेत. साहित्य संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन मा एन डी राठोड,प्रदेशाध्यक्ष गोर बंजारा साहित्य संघ, “आठवणीचं गाठोडंकार ” मोतिराम राठोड, गणेश राठोड ,दमाळ प्रकाशन ; प्रा जी के चव्हाण, नाथराव राठोड, प्रकाशक श्रावण राठोड, शिक्षक – कवी गणेश चव्हाण,कवी विजय पवार यांनी केले आहे.