भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सर्व देश देशभक्तीने व राष्ट्रभक्तीने जागृत झाला आहे. यावर्षी अमृत महोत्सवाची सांगता समारोप येणाऱ्या 15 ऑगस्टला केला जाणार आहे याचे औचित्य साधून *माझी माती, माझा देश* हा उपक्रम आपल्या देशाने तळागाळातील माणसापर्यंत नेण्याचा संकल्प केला आहे त्यानिमित्ताने केलेला हा शब्द प्रपंच….
जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा मोठे व महान असतात हे आपण नेहमी ऐकत आहोत. आपला देश स्वातंत्र्य झाला येथील प्रत्येक नागरिकाला या गोष्टीचा अभिमान आणि स्वाभिमान आहे. आपली गुलामी आपण झुगारून टाकली, आपल्या देशाच्या वारसाचे आपण जतन करावयाचे आहे, त्यासाठी सर्वांनाच शपथ घ्यायची आहे. *भारताला विकसित देश बनवायचे आहे तसेच 2047 पर्यंत भारताचे स्वप्न साकार करावयाचे आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायचे आहे. एकता आणि एकजूटचा यासाठी कर्तव्यदक्ष राहायचे आहे. नागरिकांचे कर्तव्य बजावयाचे आहे तसेच देशाचे रक्षण करण्याचा आदर ठेवायचा आहे* ही शपथ नऊ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता एकाच वेळी घेतलेली आहे ,शुरावीरांना वंदन करूया या देशासाठी ज्यांनी आपल्या घरावर तुळशी पात्र ठेवून जीवन जगले तसेच लढता लढता वीरगती प्राप्त झाली. अनेक वीरांना फासावर लटकवण्यात आले. अनेक जणांच्या संसाराची राख रांगोळी झाली, या सर्वांचे आपण क्रांती दिनाच्या निमित्ताने स्मरण करणार आहोत ,त्यांच्या स्मृती आपणास जागी ठेवायच्या आहेत. सर्व शहीदाविषयी कृतज्ञता बाळगायचे आहे. त्यामुळेच मेरी मिट्टी, मेरा देश हे अभिमान आपणाला राबवायचे आहे. गावोगावी वाड्या वस्तीवर ध्वजारोहण करावयाचे आहे. प्रत्येक जणांनी घराच्या समोर तिरंगा झेंडा लावायचा आहे.प्रत्येक गावातील माती एका कलशातून एकत्र करून ती भारताची राजधानी दिल्ली येथे कर्तव्यपथावर अमृतवटीकेसाठी पाठवण्यात येणार आहे त्यामुळे या अभियानात सर्वांनी हजर व्हायचे आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सर्वांनी आनंदाने साजरा करत असताना आपली जन्मभूमी आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जोपासायचा आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानांच्या प्रति ऋण व्यक्त करण्यासाठी व देशाला विकसित बनविण्यासाठी शपथ नागरिकांनी घ्यायची आहे. मन की बात या कार्यक्रमातून ही घोषणा करण्यात आली आहे भावी पिढी अमली पदार्थ पासून दूर राहावी आपल्या देशावर सर्वांचे प्रेम असावे अजतागायत अकरा कोटी लोकांनी या अमली पदार्थाच्या विरोधातील मोहिमेत सहभागी झाले. आगामी काळात देशासाठी वाटचाल कशी असावी या विषयाचा वेध घेताना स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांची ही स्मरण व्हावे 2047 पर्यंत आपला देश विकसित व्हावा त्यासाठी आपण एकत्रित येणार आहोत, हातात मातीचा दिवा धरून काढलेली सेल्फी नागरिक संकेतस्थळावर अपलोड करू शकतात त्यामुळे सर्वांनी या स्फूर्तीदायी उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीं यांनी केले आहे.
शब्दांकन
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपतराव*
अध्यक्ष, विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड जि. नांदेड