कंधार – १६/८/२०२३
कंधार – आपण आपल्या गावाच आणि शाळेचे काही देण लागतो ह्या उद्देशाने जनता हायस्कूलचे माजी विद्यार्थी तथा नांदेडचे सुप्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ. विजय यन्नावार व त्यांची पत्नी डॉ कल्याणी यन्नावार यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेतील ४०० विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकवृंदाचे मोफत दंत रोग निदान शिबीर केले.
तालुक्यातील कौठा येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे जनता हायस्कूल ह्या गावातील शाळेत आपण शिकलो मोठे झालो ह्या सदसद्विवेकबुद्धीने नांदेड येथील सुप्रसिद्ध दंतरोग तज्ञ तथा हिंगोली दंत महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. विजय यन्नावार यांनी आपल्या बालपणीच्या शाळेत ७६ व्या स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकवृंदाचे मोफत दंतरोग निदान शिबीर आयोजित केले. विशेष म्हणजे यावेळी ओरोकेअर डेंटल केअर हाॅस्पिटलच्या वतीने दंतरुग्णाना मोफत टूथपेस्ट व ब्रश देण्यात आला. ह्या मोफत शिबीराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष नागोराव देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून ओमप्रकाश देशमुख,माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रतिनिधी तथा माजी सरपंच शिवकुमार देशमुख. विदमान सरपंच सौ. अर्चना देशमुख,उपसरपंच गंगाधर हाते,चेरमन प्रताप देशमुख, आझाद ग्रुपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर देशमुख,तंटामुक्तीचे अध्यक्ष संभाजी देशमुख, यांची प्रमुख उपस्थिती होती.दिपप्रज्वलन केल्यानंतर प्रमुखांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. विजय यन्नावार यांनी आपले कर्तव्य म्हणून केलेल्या ह्या स्तुत्य उपक्रमाची तोंडभर स्तुती केली.
यावेळी ओराकेअर डेन्टल क्लिनीकचे संचालक डॉ.विजय यन्नावार व डॉ.कल्याणी यन्नावार आणि त्यांचे सहकारी डॉ. संदिप चिलवारवार,डॉ श्रुतिका रत्नपारखी, डॉ. प्रिती कंधारे, डॉ. गायत्री कुलकर्णी,डॉ. आश्विनी मुंढे यांच्यासह इतर दंत तज्ञांनी शाळेतील ४०० विद्यार्थी व विद्यार्थीनी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या दांताची तपासणी व त्यावर उपाय म्हणून औषधी मोफत वाटप करण्यात आले.यावेळी प्रत्येक रूग्णांना टूथपेस्ट – ब्रश देण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन ओरोकेअर डेंटल केअर हाॅस्पिटलच्या वतीने करण्यात आले होते तर शिबीर यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक मुंडे सर,पर्यवेक्षक सोनटक्के सर,मोरे सर,रुद्रावार सर मन्मथ देशमुख सर,पाटील सर,नारलावार सर,कळसकर सर, कैलास देशमुख सर,मलदोडे सर आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रभाकर देशमुख यांनी केले.