दिल्ली येथील आझादी का अमृत महोत्सव जिज्ञासा राष्ट्रीय परीक्षेत ऋतुजा अन्नमवाड चे यश

 

नांदेड ; प्रतिनिधी

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय व केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय भारत यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र दिल्ली येथे आयोजित भारतातील सर्वात मोठी जिज्ञासा आझादी का अमृत महोत्सव प्रश्नमंजुषा या स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील किनवट तालुक्यातील कोल्हारी या आदिवासी भागातील ऋतुजा पंडित अन्नमवाड या विद्यार्थिनीने घवघवीत यश संपादन केले.

 

संपूर्ण भारतातुन या परीक्षेसाठी 28 राज्यांमधील जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर 40 हजार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेऊन अंतिम फेरीसाठी त्यातील 12 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामधे दिव्यांग प्रवर्गातून दोन विद्यार्थ्यांची संपूर्ण भारतातून निवड करण्यात आली त्यामध्ये ऋतुजा या विद्यार्थिनीने सर्व लेवल पार करत राष्ट्रीय स्तरावर मजल मारली .

 

केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी ,राज्य पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री रामेश्वर तेली दिल्ली तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन चे चेअरमन श्रीकांत वैद्य यांच्या हस्ते प्रमाणपत्र, ट्रॉफी व एक लाख 25 हजाराचा चेक तीला प्रदान करण्यात आला.
अत्यंत बिकट परिस्थितीत डीएमएलटी चे शिक्षण घेत तिने या स्पर्धेसाठी नोंदणी केली व सर्व लेवल पार करत राष्ट्रीय स्तरावर मजल मारली .परीक्षेच्या तयारीसाठी तिला जिल्हा परिषद हायस्कूल कोसमेट चे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कैलास नकुले व प्रशालेतील सर्व शिक्षकांनी तिला वेळोवेळी मार्गदर्शन केले. करिता सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

कौटुंबिक पार्श्वभूमी
ऋतुजा चे वडील अल्पभूधारक शेतकरी असून आई लक्ष्मीबाई त्यांना शेतात मदत करते. मोठा भाऊ अरविंद शेती करत पदवीचे शिक्षण पूर्ण करत आहे. हलाखीच्या परिस्थितीत ते आपल्या दोन्ही मुलांना शिक्षण देत आहेत.त्यांची मुलगी मोठी अधिकारी व्हावी हे त्यांचे स्वप्न आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *