वडिलांच्या स्मृती निमीत्ताने गरजु विद्यार्थ्यांना मदत ; उपअभियंता अमीत तिडके यांचा सामाजिक उपक्रमात सायकल व शैक्षणिक साहित्याचे वाटप

 

माळाकोळी; ( एकनाथ तिडके )

माळाकोळी येथील रहिवासी असलेले व पुणे येथे पीएमआरडीए मध्ये उपअभियंता पदावर कार्यरत असलेले अमीत ज्ञानदेव तिडके यांनी वडिल दिवंगत प्राचार्य ज्ञानदेव विठ्ठलराव तिडके यांच्या स्मृती निमित्ताने आपल्या जन्मभुमीत गुणवंत गरजु विद्यार्थ्यांना मदत करण्याचा सामाजिक उपक्रम यावर्षीपासून सुरु केला आहे, यावर्षी पहिल्यांदाच त्यांनी चार गुणवंत गरजु विद्यार्थ्यांना सायकल व ईतर शैक्षणिक साहित्य स्वातंत्र्य दिनी वाटप करण्यात आले आहे.
पहिल्या वर्षीच्या या उपक्रमात जिल्हा परिषद हायस्कूल शाळेतील कु आकांक्षा राम सुर्यकांबळे वर्ग १० वा, सोनाली माधव गांजरे वर्ग ७वा तर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील कृष्णा राघोजी दहिफळे वर्ग ५ वा व सुप्रीया लक्ष्मण राठोड वर्ग ७वा या गुणवंत गरजु विद्यार्थ्यांना सायकल , वह्या व शैक्षणिक साहित्य सरपंच गंगाबाई तिडके व मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे.
हा उपक्रम दरवर्षी राबवला जाणार असून यामुळे गुणवंत असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना मदत होणार आहे, दिवंगत प्राचार्य ज्ञानदेव विठ्ठलराव तिडके यांनी नांदेड येथे प्राचार्य पदावर कार्यरत असताना अनेक विद्यार्थ्यांना घडवले आहे,त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत, जिल्हा परिषद नांदेड चे माजी अध्यक्ष दिलीपराव बेटमोगरेकर हे त्यांचेच विद्यार्थी आहेत, त्यांच्या स्मृती ईतर कोणत्याही अनावश्यक खर्च टाळत अशा सामाजिक उपक्रमाने जोपासणे हीच खरी श्रद्धांजली असल्याचे अमीत तिडके यांना वाटते, उच्च पदावर कार्यरत असुनही जन्मभुमीशी नाळ कायम ठेवत उपअभियंता अमीत तिडके यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक गावकर्यांनी केले आहे. दिवंगत प्राचार्य ज्ञानदेव तिडके हे सुद्धा जिल्हा परिषद हायस्कूल माळाकोळी चे विद्यार्थी आहेत हे विशेष.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *