खिमट

थोडा वेगळा वाटतोय का शब्द ??.. लहान मुलांना जी खिमटी देतो तो यावरूनच शब्द आला असेल का ??..
कोणी गुरगुट्या भात म्हणतं तर कोणी मउ भात म्हणतं..अजूनही त्याला वेगळे शब्द असावेत..
आमच्या कोकणात याला खिमट म्हणतात.. सचिन ला म्हटलं , आज नास्ट्याला खिमट करु कारे ??
तोही आनंदाने हो म्हणाला.. शेतातील इंद्रायणी तांदूळ , घरातील साजूक तुप आणि मेतकुट.. पंचपक्वान्न सुध्दा फिकं पडेल अशी ही न्याहरी.. पचायला हलकी आणि हेल्दी.. त्यासोबत कैरीचं लोणचं.. सुख यापेक्षा काय असावं ना..
डाएट वाल्यानो, भात खाऊ नका असं सांगणाऱ्यानो , चिकन खा सांगणाऱ्यानो एकदा मनसोक्त खिमट खा रे.. आपल्या चांगल्या गोष्टी खाऊ नका सांगायचं आणि व्यायाम न करता वजन कमी करतो अशी जाहिरात करायची यापेक्षा रोज व्यायाम करा आणि पारंपरिक पदार्थाना बाजूला न करता योग्य वेळी योग्य खाऊन हेल्दी रहा..
आता खिमट खात असताना आणि भगवंताचे आभार मानत असताना वाटलं आपलं आयुष्यही या खिमटासारखच हवं .. एकदम साधं , सरळ , कमी गोष्टीत आनंद आणि सुख..
लक्झरीच्या मागे पळताना किवा ब्रेडबटर खातो सांगताना या पदार्थाना आपण दुर सारतो आणि फॉरेनहुन याचे पेट्न्ट भारतात आले की त्याच्या मागे धावतो.. मॉडर्न काय घ्यायचं हेही आपल्याला समजायलाच हवं.. भारताबाहेर अनेक कृष्ण भक्त आहेत किवा लाखो लोक भगवद्गीता फॉलो करतात कारण त्यातील मर्म त्यांनी जाणलय आणि आजही आपल्याकडे भगवद्गीता काय आहे माहीत नाही.. अगदी ती या खिमटासारखी आहे म्हणजेच तुम्ही भगवंताचे नाव घ्या तो हवं ते देइल.. its that simple..simplicity is the beauty..
खिमटाचा आस्वाद घेता घेता हरीनाम घ्या आणि फरक पहा.. सोनल कायम आनंदी का याचं उत्तर यात आहे..
सोच बदलो.. देश बदलेगा..

सोनल गोडबोले

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *