कंधार ; प्रतिनिधी
रक्षाबंधन सण म्हणजे बहिण-भावांच्या स्नेहभावनेला जागृत करणारा भारतीय संस्कृतीतील सण-उत्सवातील महत्त्वाचा सण आहे.यातच भारतीय वीर सैनिक बंधु आपल्या परिवारा पासून कोसोदूर राहून आपल्या भारत मातेची सेवा डोळ्यात तेल घालून दिवस-रात्र करत असतात.गेल्या दहा वर्षां पासुन मन्याड खोर्यातील स्फूर्तिदायक रक्षाबंधनाच्या उपक्रमातून सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार दरवर्षीच ३३३३ सदिच्छापत्र व ३३३३ राख्या सोबत १५ फुटाची महाराखी पाठविचा उपक्रम डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या प्रेरणेतून अखंडित सुरु आहे.सन १९९९ मध्ये भारतीय सैनिकांनी पाकड्या रेंजर्सना चारी मुंड्या चीत केल्यानंतर ऑगस्ट महिन्यात संत नामदेव महाराज मठ संस्थान उमरज व श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार यांच्या संयुक्त विद्यमाने कंधार शहरात मिरवणूक काढून भारतीय सैनिकांना चांदीची बोफोर्स तोफ कंधार मामलेदार कचेरीच्या मध्यस्तीने भारतीय सीमेकडे रवाना करुन मन्याड खोरी अनोखी परंपरा दाखवून दिली होती.हैद्राबाद मुक्ती संग्राम लढा, ७ ऑगस्टचा विद्यार्थी दशेतला छ.संभाजी नगरचा गोर्यांच्या विरोधतला सत्याग्रहा वेळी खाली पडले, लाठ्या-काठ्या झेलल्या पण हातात असलेला प्राणप्रिय राष्ट्रध्वज तिरंगा फडकत ठेवत आपली स्वाभिमानी देशभक्त इंग्रजांना दावली.
दरवर्षीच १३ व १४ सप्टेंबर रोजी हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यातील धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांच्या व रझाकारांचा डटकर मुकाबला करणाऱ्या बहाद्दर स्वातंत्र्य सैनिकांच्या तीर्थक्षेत्रांच्या दर्शनसाठी रणयात्रा काढून इतिहास घडविला.हौतात्म्यांचे नातेवाईक,स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे नातेवाईकांचा सत्कार आपल्या श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार संस्थेतील विविध शाखांमधून १७ सप्टेंबर रोजी दरवर्षीच करुन त्यांच्या मर्दुमकीला शाबाशी दिली.
मन्याड व गोदा खोर्यातून १५ फुटाची महाराखी डाॅ.भाई मुक्ताईसुत यांच्या समर्थ हाताने सुगंधी अत्तर लावून विमोचन करुन पाठविण्याची पध्दत होती.यंदा डाॅ.भाई केशवराव धोंडगे हे व्यक्तीमत्व चीर निद्रिस्त झाल्याने महाराखीचे विमोचन क्रांतिज्योती ज्ञानसागर शक्तीपिठाच्या चीरसमाधी स्थळी त्यांचे सुपुत्र प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम केशवराव धोंडगे यांच्या समर्थ आज भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या ध्वजारोहण दिनाचे औचित्य साधून हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्याच्या अमृत महोत्सवी वर्षात समर्थ हस्ते करण्यात आले.