राज्यातील उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना गौरवणारा महाराष्ट्र उद्योग पुरस्कार

मुंबई : राज्यातील उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना गौरवणारा #महाराष्ट्र_उद्योग_पुरस्कार_२०२३ सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला.

वांद्रे-कुर्ला संकुलातील जियो वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास राज्यपाल रमेश बैस तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.

यावर्षी पहिला #उद्योगरत्न पुरस्कार देशातील ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण #रतन_टाटा यांना तर #उद्योगमित्र पुरस्कार #सिरम_इन्स्टिट्यूट च्या #आदर_पुनावाला यांना, #उद्योगिनी पुरस्कार #किर्लोस्कर_ग्रुप च्या #गौरी_किर्लोस्कर यांना, तर #उत्कृष्ट_मराठी_उद्योजक पुरस्कार #सह्याद्री_ऍग्रो_फार्म्स च्या विलास शिंदे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रक्कम असे या पुरस्कारांचे स्वरूप होते.

यावेळी बोलताना, टाटा म्हणजे ट्रस्ट आणि टाटा म्हणजेच गुणवत्तेची खात्री हे समीकरण असल्याचे मत व्यक्त केले. आपण कुणी देव पाहिलेला नाही पण माणसातील देव रतन टाटा यांच्या रूपाने आपण सर्वांनी अनेकदा पहिला असल्याने त्यांना उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांना दिलेल्या या पुरस्कारामुळे पुरस्काराची उंची वाढली असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

त्यांच्यासह आदर पुनावाला यांचे #कोविड काळातील कार्य उल्लेखनीय आहे. कोरोना कालखंडात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या साथीने जे काम केले त्याला तोड नाही. त्यामुळे लाखो लोकांना जीवनदान मिळाले. श्रीमती गौरी किर्लोस्कर यांनी उद्योग क्षेत्रात नवे प्रयोग केले आहेत. त्यांच्या रूपाने एक भगिनी एवढ्या समर्थपणे उद्योग सांभाळते आणि पुढे नेत आहे कौतुकास्पद आहे. विलास शिंदे यांनी शेतीतील नवे प्रयोग करताना, अनेक शेतकऱ्यांना सोबत घेतले तसेच पारंपरिक शेतीत नवे प्रयोग केले असे कौतुक यावेळी केले.

राज्यातील महायुती सरकारवर विश्वास ठेवून अनेक उद्योग महाराष्ट्रात येत असून या उद्योगांना सहकार्य करण्याची शासनाची भूमिका असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

राज्य शासनाच्या वतीने राज्यातील युवकांना, नवउद्योजकाना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘यु आर मित्र’ या नवीन उपक्रमाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या अभियानाद्वारे येत्या वर्षभरात ५ हजार नवीन स्टार्ट अप उभी करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.

यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा तसेच उद्योग क्षेत्रातील देश परदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *