आताच एक फोटो माझ्या मित्राने शेअर केला होता.. त्या फोटोमधे सगळेजण व्यस्त आहेत ते चांद्रयान लॅंडींग पहाण्यात आणि त्याचवेळी एक मुलगा व्यस्त आहे एका मुलीकडे पहाण्यात.. म्हणजेच त्याच्या जमीनीवरील चंद्राला पहाण्यात.
अगदी सहज आणि नैसर्गिक प्रक्रीया आहे ना..तोच फोटो मी माझ्या मित्रांना पाठवला त्यावर एकाचा रीप्लाय आला , आमचं यान गोव्यातुन पुण्यात आलं का ??.. मी म्हटलं , लॅंडींग होवुन २४ तास झाले आणि आता पुढच्या मोहीमेची तयारी मनातल्या मनात सुरुही झाली.. सतत फुलपाखरासारखी मी भिरभिरत असते म्हणुनच नवीन लिहायलाही सुचतं..
यावरुन माझ्या मित्राचा किस्सा आठवला तो शेअर करते.. आमच्याच एका गृपमधे एक सुंदरी होती पण लाजाळू होती..
तो पार्टीला आला आणि तिच्या अदानी घायाळ झाला.. फ्लर्टींग करायला तासाभरातच सुरुवात झाली..तिच्याबद्दल फार काही माहीत नसताना सेल्फी घे अर्थात तीही बिंधास्तपणे फोटो देत होती.. त्याच्याशी बोलत होती.. मोकळ्या वागणाऱ्या लोकांच्या मनात फार काही नसतं पण लोक तिला गृहित धरतात आणि तसेच रीॲक्ट होतात…तिथेही तेच झालं.. त्याने ड्रींक घेतली होती.. पार्टी रंगात आली होती.. याला वाटलं ही आपल्याला पटली म्हणुन पार्टीचं बीलही त्यानेच दिलं आणि तिचा नंबर घेतला आणि म्हणाला ,मी सोडु का तुला ??.. तु कुठे रहातेस आणि कशी आली आहेस ??
त्यावर ती म्हणाली , प्रकाश येतोय मी तुझी ओळख करुन देते..
जेव्हा तिचा नवरा तिथे आला तेव्हा त्याला पाहुन त्याची पूर्ण उतरली आणि बील दिल्याचा पाश्चातापही झाला कारण प्रकाश म्हणजेच तिचा नवरा हा त्याचा मित्र होता.. तुम्ही हसताय ना.. भरपुर हसा.. आम्हीही त्यादिवशी असेच हसलो होतो.. हा फोटो पाहिल्यावर मला तेच आठवलं.. पृथ्वीवरचा चंद्र नक्की कोणाचा आहे याची खात्री करुन घ्या नाहीतर अशी अवस्था व्हायची..
नैसर्गिक गोष्टी असल्या तरीही आपल्याला मनाला आवर घालता यायला हवा .. सोशल मिडीयावरुन असे अनेक फनी घटना ऐकायला येतात पण ही घटना प्रत्यक्ष अनुभवली होती..
तो मित्र कोरोनामधे गेला नाहीतर आता त्याने हा किस्सा वाचुन माझी मानगुटी पकडली असती.. तो इथे नसला तरीही एक आठवण मागे ठेवुन गेला…
सोनल गोडबोले
,