कंधार; प्रतिनिधी
कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणूक सन 2023- 2028 या कालावधीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या प्रचारानिमित्त शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस युतीच्या शेतकरी विकास पॅनलच्या वतीने बहादरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार व नारळ फोडून बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला .
यावेळी शेकाप व काँग्रेसच्या वतीने मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते, बहादरपूरा येथे प्रचारानिमित्त प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी व संचालक व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातील शिंदे रोहित रावसाहेब, चोंडे ज्ञानेश्वर बळीराम, देशमुख प्रताप दिगंबराव, जोगदंड रमाकांत विश्वंभर, वडजे गंगाधर गोविंदराव, कदम देविदास रामचंद्र, शिंदे बाबाराव हनुमंतराव, सेवा सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघातून नाकाडे जनाबाई शिवाजीराव, खुडे पुष्पा कैलास, सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदार संघातून मानसपुरे सत्यनारायण मोहनराव, सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती,भटक्या जमाती मतदारसंघातून देवकते सतीश दगडोपंत , ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण जाधव गोपाळ व्यंकटराव, पेठकर चंद्रकांत माधवराव ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ गायकवाड व्यंकटराव जळबा , ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघ शिंदे अवधूत मारुती , व्यापारी मतदारसंघ महाजन मोहन हरिभाऊ ,मामडे गिरीश शंकरराव हमाल मतदारसंघ कांबळे राजेश विठ्ठल वरील सर्व शेतकरी विकास पॅनलच्या 18 उमेदवारांची प्रमुख उपस्थिती होती,
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक शंकरराव पेठकर, माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे, शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे,काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, कंधार काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बालाजीराव पांडागळे ,लोहा तालुका अध्यक्ष शरद पवार ,माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, माजी सभापती ज्ञानेश्वर चोंडे , मा.नगरसेवक शाहूराज नळगे, माजी नगराध्यक्ष रामराव पवार, माजी उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, उपसभापती शाम पवार, मा.प.स.सभापती भाऊसाहेब कदम,माजी नगराध्यक्ष स्वप्निल लुंगारे,लालबा शिंदे,देविदास गुरुजी कारभारी, जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर सह शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस युतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस युतीच्या शेतकरी विकास पॅनलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, यावेळी लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे म्हणाले की, तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी व्यापाऱ्यांची सुरक्षितता, हमाल मापाडी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस पुरस्कृत सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी आमदार शिंदे यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले, शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असून बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताच्या सर्व कल्याणकारी योजना आम्ही येणाऱ्या काळात राबविण्यासाठी बांधिल असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधव, व्यापारी, हमाल मापाडी यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जाणार असून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी बोलताना सांगितले,आयुष्यात आम्ही चांगलेच समाज हिताची कामे सतत केलेली असल्याने कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून विकासाच्या बाजूने मतदारराजा नक्कीच शेकाप काँग्रेस युतीच्या शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देतील असा विश्वास यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी व्यक्त केला, यावेळी शेकापचे माजी आमदार गुरुनाथ कुरुडे,शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे, काँग्रस जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर,काँग्रेस तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, लोहा तालुका अध्यक्ष शरद पवार, सहप्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, यावेळी शेकाप लोहा तालुका अध्यक्ष नागेश हिलाल, बाहादरपुराचे सरपंच हनुमंत पेठकर, अशोक बोधगिरे ,वसंत मंगनाळे, सुधाकर सातपुते, सिद्धू वडजे, अवधूत पेठकर,महेश पिनाटे सह पदाधिकारी, कार्यकर्ते, संचालक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.