महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर  का नकोत ?

ज्यात वंचित बहुजन आघाडीला जनाधार असुन मोठ्या प्रमाणात  मतदार   प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी आहेत  तर राज्यात वंचित बहुजन आघाडीचं वेगळं अस्तीत्व आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला असो की विरोधी पक्षाला वंचितची चांगलीच धडकी भरली आहे. वंचित बहुजन आघाडी ज्या पक्षासोबत युती करेल त्या पक्षाची  सत्ता राज्यात येणार त्यामुळे वंचितला महाविकास आघाडी सोबत जाण्यास सत्ताधारी पक्ष काॅग्रेस ,राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नेत्यावर दबाव टाकुन वंचितला      महाविकास आघाडीपासुन रोखण्याचा प्रयत्न करीत आसावेत आणि तपास यंञणेला घाबरुन   काॅग्रेस, आणि राष्ट्रवादी काॅग्रेसला  महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर नको आहेत.

 

देशातील व राज्यातील  कांही  तपास यंञणा   राजकिय पक्षाच्या  हातचे बाहुले बनले  आहेत.  या  तपास यंञनेला व राजकिय  पक्षाच्या दबावाला  घाबरुन  महाविकास आघाडीत व  इंडिया  आघाडीत     वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर  नको  आहेत. कारण  सत्ताधारी पक्षानी  तपास यंञनेचा गैर  वापर केला तर   नाहक   आपण  अडचनित येवु शकतो.  अशी भिती  काॅग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांना  वाटत असावी   म्हणुन  वंचित बहूजन आघाडीला महाविकास आघाडीपासुन दुर ठेेवल्या जात आहे असे आता अनेकाना वाटु लागले आहे.

 

 

२०१९  च्या  लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने राज्यात दमदार कामगिरी  केली असुन  १४ टक्के मते घेवून  काॅग्रेस ,राष्ट्रवादी काॅग्रेस  पक्षाला मोठा धक्का दिला.  आणि सत्तेपासुन रोखण्याचे काम  वंचित बहुजन आघाडीने केले आहे.  याचा मोठा  फायदा      राज्यातल्या   सत्ताधारी पक्षाला  झाला आहे  .म्हणुन सत्ताधारी  पक्षाला माहित  आसावे. की, वंचित बहुजन आघाडीचे  राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर  हे राष्ट्रीय काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षासोबत म्हणजेेच महाविकास  आघाडी सोबत   वंचित  बहुजन आघाडीची   युती झाल्यास  राज्यात   भाजपाची   पुन्हा  सत्ता  येेणार नाही. या भितीपोटी सत्ताधार्‍यानी  दबाव तंञाचा वापर    काॅग्रेस,राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या नेत्यावर   केेला असावा असे सामान्य  जनतेला   वाटत  आहे.कारण प्रकाश तथा बाळासाहेब  आंबेडकर यांच्यासोबत  राज्यातील   मोठा  मतदारवर्ग  आहे.  वंचित बहुजन आघाडीची २०१९ ची कामगिरी पाहुन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी वंचित बहुजन आघाडीची युती केली आहे.ही युती दलित ,शोषीत, पिडीत सर्व बहुजन समाजाला मान्य आहे कारण उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा झाल्याबरोबर राज्यातील जनतेने पेढे वाटुन आनंद साजरा केला आणि या युतीचे मोठ्या दिलाने जनतेनी स्वागत केले हेच कुठेतरी  पुरोगामीचा बुरखा पांघरलेल्या काॅग्रेस, राष्ट्रवादी  काॅग्रेस पक्षाच्या पोटात दुखत असावे कारण ही युती झाली तर मागासवर्गीय समाजाला सत्तेपासुन दुर ठेवता येत नाही .अशीच भिती या काॅग्रेस ,राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाला  वाटत असावी म्हणुन     राज्यातल्या महाविकास आघाडीत आणि देशाच्या इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर जसे सत्ताधारी पक्षाला नको आहेत तसे काॅग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाला नको आहेत कारण सत्ताधारी पक्षाला महाविकास आघाडीसोबत आंबेडकरांची युती झाली तर आपली सत्ता येवु शकत नाही.त्यामुळे आंबेडकर नको आहेत आणि काॅग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नेत्यांना आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेतले तर सत्ताधारी तपास यंञनेचा सुसेमिरा लावतील या भितीपोटी आंबेडकर महाविकास आघाडीत नको आहेत.

म्हणुन    येणार्‍या   २०२४ च्या निवडणुकीत काॅग्रेस ,राष्ट्रवादी काॅग्रेसच्या   महाविकास आघाडी पासुन  प्रकाश तथा बाळासाहेब  आंबेडकर यांना  कसे  दुर ठेवता  येईल  याचे  प्रयत्न   सतत  सत्ताधारी  पक्ष  करीत असावेत. आणि त्याला  काॅग्रेस  राष्ट्रवादी  काॅग्रेस पक्षाचे नेते  तपास यंञनेच्या  भितीपोटी  वंचितला  महाविकास आघाडीत सामावुन घेण्याऐवजी जनतेत  वंचित बहूजन आघाडी  विषयी चुकिच्या बातम्या  पेरुन जनतेची दिशाभुल करीत आहेत. आम्ही युतीसाठी प्रकाश  आंबेडकरांना बोलवल पण  प्रकाश आंबेडकर हट्टी आहेत. ती भाजपाची बी टीम आहे.  काॅग्रेस ,राष्ट्रवादी काॅग्रेस सोबत युती करत नाहीत असे अनेक आरोप काॅग्रेस पक्षाकडुन   प्रकाश तथा  बाळासाहेब   आंबेडकरांवर  केले जातात.

२०१९    च्या   निवडणुकीत   प्रकाश तथा  बाळासाहेब      आंबेडकरानी  काॅग्रेस,राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाला युती करण्यासाठी आमची दारे खुली आहेत, असे   खुले   आवाहन  केले होते. पण ते अवाहन काॅग्रेसने स्विकारलेले नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी काॅग्रेसला एवढेसुध्दा सांगितले होते की,  काॅग्रेस पक्षाचा   ज्या  ज्या मतदार  संघात तीन वेळा पराभव  झाला.   त्या  जागा    आम्हाला द्या त्या  आम्ही लढवु  ते    सुध्दा काॅग्रेसनी  मान्य केले नाही.  खरं म्हणजे काॅग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाला   प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत  युतीच करायची नव्हती हे निर्विवाद सत्य आहे.               महाविकास  आघाडीत प्रकाश आंबेडकर का नको याची अनेक कारणे आहेत. सत्ताधार्‍यांना वाटत  असावे  की   प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत सामावुन घेतले तर आघडी मजबुत  होईल आणि त्याचा  फटका भारतीय जनता पक्षाला बसु शकतो  म्हणुन भारतीय जनता पक्ष   काॅग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या   आघाडीच्या नेत्यावर  दबाव तंञाचा वापर  करुन   काॅग्रेस,  राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या  निर्णायक वरीष्ठ  नेत्यांची  सत्तेतील  कारनामे  बाहेर  काढु  असा दम तर सत्ताधार्‍यांनी दिला नसावा  असे अनेक प्रश्न जनतेतुन उपस्थित केल्या जात आहेत.  सत्ताधारी पक्षाने   महविकास  आघाडीच्या     नेत्याना   आत जाता  की ? बाहेर राहाता ?  असा दबाव तंञाचा तर वापर   केला नाही ना    असे अनेकांना वाटू लागले  आहे.   म्हणुन   काॅग्रेस ,राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष  प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर   यांना महाविकास आघाडीमध्ये  सामिल करुन घेत नाही हे निर्विवाद सत्य आहे.

मुंबईत विरोधकाची एकजूट झाली भाजपाचा एकञीतपणे सामना करण्यासाठी भाजप विरोधक सर्वच पक्ष इंडियात सहभागी झाले पण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांना इंडिया बैठकिचे निमंञन दिले नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर नाराज असले तरी  महाविकास आघाडीला  भविष्यात   हे परवडणारं नाही. वंचित बहुजन आघाडीने २०१९  मध्ये केलेल्या कामगीरीचा आढावा घेतल्यास महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी सोबत दुरावा ठेलल्यास महाविकास आघाडी आणि इंडियासाठी धोक्याची घंटा ठरु शकते  हे निर्वीवाद सत्य आहे.    कारण मागील लोकसभा निवडणुकीत  वंचित बहुजन आघाडीने जवळपास १४ टक्के मतदान घेतले  होते.  राज्यात वंचित बहुजन आघाडीच्या दणक्याने काॅग्रेस, राष्ट्रवादी कॅाग्रेसला जवळपास  ७  ते ८ मतदारसंघात   वंचितची   किंमत मोजावी लगली आहे. कारण विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला  एकही जागा जिंगता आली नसली तरी पक्षाच्या २२४ उमेदवारानी २५ लाख ७ हजार मते घेवुन तब्बल ४.६ मते घेतली आहेत. त्यामुळे काॅग्रेस राष्ट्रवादी काॅग्रेसला जवळपास राज्यात    ३२ जागांच नुकसान सोसावं  लागले आहे. काॅग्रेस ,राष्ट्रवादी काॅग्रेस, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या महाविकास आघाडीला खरच  भाजपाला सत्तेपासुन रोखायचे असेल तर  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना  दुर ठेवुन चालनार नाही.    महाविकास आघाडीत सामुन घेणे काळची गरज आहे. वंचित बहुजन आघाडी शिवाय  भारतीय जनता पक्षाला सत्तेपासुन रोखने अशक्य बाब आहे.

विश्वरत्न ,भारतरत्न,महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सतत राष्ट्रीय काॅग्रेस पक्षानी विरोध केला.आणि आजही राष्ट्रीय काॅग्रेस त्याच भुमिकेत आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना जसा राष्ट्रीय काॅग्रेने विरोध केला तसाच विरोध आजची राष्ट्रीय काॅग्रेस महामानव भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे नातु  व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना  विरोध करीत आहे  हे काॅग्रेसला पवडणार नाही. त्याची किंमत काॅग्रेसला मोजावी  लागेल कारण जनता फार हुशार झाली आहे.  तुम्ही कोणता  बुरखा पांघरला आज आम्ही ओळखु शकतो  खरच भाजपाला सत्ते पासुन रोखायचे असेल तर  महाविकास आघाडीत व इंडिया आघाडीत  प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना  सामावुन घेतले तरच सत्तेपासुन भाजपाला रोखता येईल अन्यथा  भाजपाला रोखने  दोन्ही काॅग्रेस पक्षाला  अशक्य आहे.  ही काळ्या दगडावरची रेष आहे.

 

पञकार प्रल्हाद दे. आगबोटे कंधार

जि. नांदेड.

मो. ९५६१९६३९३९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *