कंधार ; प्रतिनिधी
तब्बल 26 वर्षानंतर घेण्यात आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच निवडणूक संपूर्ण नांदेड जिल्ह्यात लक्षवेधी ठरली होती कंधार लोहा विधानसभा आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे पॅनल विरुद्ध नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पॅनल मध्ये लढत होऊन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पॅनलला दहा जागांवर विजय मिळाला आहे .
सदर निवडणूक म्हणजे आगामी होणाऱ्या निवडणुकीची एक प्रकारे रंगीत तालीम होती असे मानले जात असून भाजपा युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांचे खऱ्या अर्थाने यश असल्याचे मानले जात आहे .
दिनांक 3 सप्टेंबर रोजी आठ मतदान केंद्रातून सुमारे 94 टक्के मतदान झाले होते त्याचा निकाल दिनांक 4 सप्टेंबर रोजी जाहीर झाला . त्यामध्ये भाजप राष्ट्रवादी पॅनलला 10 जागा तर काँग्रेस शेकाप पॅनलला 7 जागा आणि बीआरएस , वंचित बहुजन , शिवसेना पक्षाला 1 जागा अशा 18 जागाचा निकाल निवडणूक अधिकारी जी .आर . कौरवार यांनी जाहीर केला .
त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीवर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा झेंडा फडकला आहे.