‘उज्वल’ पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन 

नांदेड – येथील उज्वल प्रतिष्ठानच्या वतीने ‘उज्वल साहित्यरत्न’ आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तिंना देण्यात येणाऱ्या  पुरस्कारांसाठी नवोदितांसह सर्व साहित्यिकांना आणि विविध क्षेत्रातील व्यक्तिंना विहित नमुन्यातील प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मराठीतील विविध साहित्यकृतींसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठीचे आणि इतर पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव शेवटचा दिनांक  ५ आॅक्टोंबर २०२३ पर्यंत उज्वल प्रतिष्ठान कंधार यांच्याकडून स्विकारण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रकाश ढवळे नागलगांवकर यांनी दिली.     
       साहित्यक्षेत्रातील कथा, कविता, नाटक, वैचारिक, आत्मकथन, कादंबरी, ललित, शैक्षणिक, धार्मिक तथा बालसाहित्य  या साहित्यप्रकारांतून एकूण ५ पुरस्कार देऊन साहित्यिकांना गौरविण्यात येणार आहे. तर वैद्यकीय, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, कृषी, सामाजिक तथा सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिंना ५ पुरस्कार दिले जाणार आहेत. तरी इच्छुकांनी विहित नमुन्यातील प्रस्तावासोबत दोन फोटो, साहित्यिकांसाठी दोन प्रकाशित साहित्यकृती (पुस्तके)  ‘उज्वल प्रतिष्ठान, प्रकाश नामदेव ढवळे, कुशीनगर, म. बसवेश्वर पुतळ्याजवळ, नवीन कौठा, नांदेड मो. ९७६६२८४८७३ या पत्त्यावर पाठवावेत असे निवड समितीचे प्रमुख प्रज्ञाधर ढवळे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *