सलग ९०१ दिवसापासून अखंडीतपणे सेवा ही संघटन हा
उपक्रम सुरु ठेवून धर्मभूषण दिलीप ठाकूर यांनी जागतिक विक्रम केल्यामुळे भाजप पक्षातील सर्वांना त्यांचा सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी केले. रुग्णांना मास्क,सैनीटायझर, बिस्किट व पाण्याची बॉटल आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना १०० छत्र्या
वाटप करून उपक्रमाची सांगता झाली.
भारतीय जनता पार्टी नांदेड व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात
लसीकरण सुरू झाला त्या दिवसापासून हा उपक्रम सुरू होता. आता पर्यंत चार लाखापेक्षा जास्त रुग्णांना मदत करण्यात आली.सांगता कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना प्रवीण साले यांनी असे सांगितले की,विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील दिन दलितांची सेवा करणारी दिलीप ठाकूर सारखी व्यक्ती शोधून देखील सापडणार नसल्यामुळे त्यांचे करावे तितके कौतुक कमी आहे.कार्यक्रमास प्रमूख पाहुणे म्हणून अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ.संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.साखरे, अनिल हजारी, बागड्या यादव, स्वप्नील गुंडावार, शंकर वानेगावकर, सतिश शर्मा,ला.शिवाजी पाटील, ला.सुनील साबू, ला.शिवा शिंदे, अनिल गाजुला, पत्रकार रविंद्र कुलकर्णी व शिलरत्न लोखंडे, अशोक सराफ,अनिता नारवाड यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना दिलीप ठाकूर यांनी आलेल्या अनुभवाचे कथन केले.कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन भाजपा प्रसिद्धीप्रमुख धीरज स्वामी यांनी तर आभारप्रदर्शन कामाजी सरोदे यांनी मानले. या उपक्रमासाठी वेळोवेळी सेवा देणारे अरुण काबरा, सविता काबरा,कामाजी सरोदे, सुरेश शर्मा, प्रभुदास वाडेकर, विलास वाडेकर, विजय वाडेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कृपाछत्र उपक्रमांतर्गत गोपाळ माळगे,दिलीप ठाकूर, सुनील उबाळे,चंद्रकांत गंजेवार, स्नेहलता जायस्वाल हैद्राबाद, विश्वजीत मारोती कदम धानोरा कौठा,सिद्राम सूर्यभान दाडगे,अविनाश रामभाऊ चिंतावार मुबंई,शैलेश इनामदार ठाणे,मोहित व रेणुका जयप्रकाश सोनी,सुधाकर रामराव जबडे देगलूर,वसंत अहिरे,संजय प्रभाकर कलकोटे, सुनीता दीक्षित वसरणी,भीमाशंकर जुजगार छ.संभाजीनगर,सौ.प्रमिला महेश भालके, उमाकांत वाखरडकर यांच्यातर्फे १०० छ्त्री देण्यात आली .