अंटी मत कहो.

सकाळी रोजच्याप्रमाणे टेकडीवर गेले… तिथे नेहमीच मुलं क्रिकेट खेळत असतात.. खाणीत गुलाबी रंगाची खुप कमळं उमललेली असतात..संपूर्ण तळं गुलाबी गुलाबी आणि त्यासोबत वयस्कर मंडळी पण गुलाबी होतात.. एका बाजूला गाई .. एकीकडे म्हशी .. मधुन व्यायामाला आलेली मंडळी.
मधेच भुभुआणि हिरवळ असं आल्हाददायक आणि प्रफुल्लित वातावरण रोजच असतं.. कोणी मजनूगिरी करत असतं तर कोणी शरीराला इतक्या जोरात हिसके देत व्यायाम करतात की पाहुन असं वाटतं एखादा अवयव उडुन हायवेवर जाऊन पडायचा आणि चमत्कार म्हणत मंडळी कोथरूडच्या दिशेने धावत सुटायची.. मधेच एखादा वाचक भेटतो ,मॅम भारी लिहीता राव..कोणी फिगर वरुन इंप्रेस करायचा प्रयत्न करत असतो.. मग मी हळूच Thanku dada म्हणते आणि सगळी हवाच काढुन टाकते.. सगळं सुंदर असताना क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा बॉल एका सुंदरीच्या पायापाशी येतो आणि तिकडुन एक कारटं ओरडतं ,,काकु बॉल टाका ना..
काकु हा शब्द ऐकताच ती सुंदरी लालबुंद होते आणि तिच्या मनातलं फक्त मीच ऐकते ,,अंटी मत कहो ना.
ती बॉल न देताच पुढे निघुन गेली म्हणुन मी खाली वाकले आणि बॉल उचलणार तितक्यात एक हॅंडसम म्हणाला , मॅम राहूदेत.. Thanku म्हणत त्याने बॉल हळूच माझ्याकडून घेतला आणि पाठमोऱ्या सुंदरी कडे मी पहात राहिले.. अंटी असणं आणि अंटी दिसणं या दोन्ही खुप वेगळ्या गोष्टी आहेत.. इथे वयाचा काहीही संबंध नाही.. इथे संबंध आहे तो रहाणीमानाचा .. कुठल्याही वयात आपण अप टु द मार्क असणं गरजेचं असतं.यावरून माझ्या सोसायटीत रहाणाऱ्या वय वर्ष फक्त ७७ आमची अनुताइ आठवली.. तिला कधीही पहा इतकी सुंदर रहाते तिला पाहुन कोणीही अंटी म्हणणार नाही.. प्रेझेंटेबल रहाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे… व्यायामाने आणि विचाराने आपण सगळ्या गोष्टी सहज मिळवु शकतो.. टेकडीवर जाणारे सुध्दा तुम्हाला फॉलो करतात तेही तुमचं अनुकरण करत असतात … सुंदर मन त्याचसोबत सुंदर शरीरआणि उत्तम विचार असतील तर समोरचा म्हणतो , मॅम I like You..
अंटी मत कहो म्हणायचय की लाजत केसात हात फिरवत ohh.. so sweet of you म्हणायचय हे फक्तआणि आपल्याच हातात आहे..
हरे कृष्ण..
सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *