नांदेड ; प्रतिनिधी
जि.प.शाळा वाघी ता.जि.नांदेड येथे “हिंदी दिन”आयोजीत केला होता.या प्रसंगी आठवीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर परिपाठ सादर केला.श्री.सुदर्शन बिंगेवार यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी दिवसाचे महत्व जाणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी श्री.क-हाळे सर यांनी हिंदी दिवसाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.तसेच शाळेची विद्यार्थींनी मुस्कान हिने विज्ञानविषयक रंजक माहिती दिली.मार्गदर्शन श्री.बिंगेवार यांनी केले.
साहित्यिक,लेखक,गीतकार आ.ग.ढवळे यांनी उत्कृष्ट शैक्षणीक गीत सादर करुन विद्यार्थ्यांची मन जिंकली.हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक एस.ओ.बादशाहा, श्री.संजय शेळगे,वडगावकर मॅडम,श्री.रावसाहेब देवकत्ते,श्री.क्षीरसागर होणराव,श्री.मधुकर कोल्हे,श्री.आर.पी.शेळके,श्री.राजकुमार गोटे,श्री.आर.डी.ढाके,हेमंत वागरे यांनी परिश्रम घेतले तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहानपर बक्षीस दिले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार वि.रा.शिंदे यांनी केले.