कंधार ; प्रतिनिधी
सिद्धेश्वर महादेव मंदिर व टेकडी परीसर पानभोसी येथे महादेवाचे दर्शन घेऊन परीसरातील निसर्ग सेवा गटाच्या माध्यमातून विविध प्रकारची व असंख्य प्रजातींची वृक्ष लागवड गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येते . दि .१४ सप्टेंबर रोजी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या हस्ते सिद्धेश्वर महादेव मंदिर व टेकडी परीसर पानभोसी येथे वृक्ष लागवड करण्यात आली .
निसर्ग सेवा गटाच्या माध्यमातून वड, पिंपळ, लिंब, आंबा ,चिकु ,करंज, कदंबा, नांदुरकी, बेल, अर्जुन, चिंच, उंबर, अशी मोठी व पर्यावरणपुरक झाडे तसेच विविध प्रकारची औषधी वनस्पती जसे शतावरी, अडुळसा, अलोवेरा, तसेच फुलवर्गीय कॉसमॉस, झेंडु, अष्टक, जास्वंद, मोगरा, हजार मोगरा, जाई, जुई, चमेली, चाफा ,घंटी, बकुळ ,काकडा, गणेरी, इत्यादी फुलझाडे लावलेली आहेत व परीसर विविध वृक्षराजीनी सुंदर नटलेला आहे.
येथील सर्व वनस्पती संदर्भात वनरक्षक शिवसांब घोडके यांनी इत्यंभूत माहिती दिली, वृक्षारोपण करण्यात आले बि.वाय चव्हाण ,पी.बी. मुंडे , शिवराज घोडके , रामदास केंद्रे यांची उपस्थिती होती .