ह्यांचा मेनोपॉज त्रास आम्हाला..

माझ्या मित्राने दिलेला विषय.. त्याची मैत्रीण वय जवळपास ४० .. तो म्हणाला , छोट्या छोट्या गोष्टीवरुन ती सारखी माझ्यावर चिडचिड करते… तो मला म्हणाला ,, इतक्या लवकर मेनोपॉज असेल का आणि त्यामुळे ती चिडचिड करत असेल का ??..
काही लोकांच्या चेहऱ्यावरच कायम बारा वाजलेले असतात त्यात पुणेकर MH – 12 .. काहींचा स्वभाव सतत रागीट चिडचिडा.. कदाचित अशा महिलांचं घरी ऐकुन घेतलं जात नसेल म्हणुन तो राग बाहेर काढायचा किवा समोरच्या व्यक्तीने आपल्याकडे पहावं , बोलावं , छान दिसते म्हणावं म्हणुन चाललेला आटापिटा असावा.. मेनोपॉजच्या नावाखाली सहानुभूती असेल किवा त्या बिचाऱ्या सखीला ( मासिकपाळी ) ला व्हीलन करुन आपण तेच टुमणं पुढे करत अनेक गोष्टी समोरच्याकडुन करुन घेणं असेल ..
माझ्या मित्राचं आणि तिचं रीलेशन नक्की काय आहे यावर त्या व्यक्तीच्या प्रतिक्रिया येणार हे ओघानेच आले..
मैत्रीपेक्षा जास्त तिला काही वाटत असेल आणि ते त्याच्याकडुन येत नसेल म्हणुन कदाचित ती सतत त्याच्यावर चिडचिड करत असावी.. तिला त्याच्याकडून काही वेगळा स्पर्श हवा असेल किवा अजुन काही.. राग कोण कोणावर काढतं तर ज्याचा त्या व्यक्तीवर हक्क असतो .. तिच्या घरातील काही अडचणी तिला त्याच्याकडे शेअर करायच्या असतील.. घरी काही आर्थिक अडचणी असु शकतात किवा नवऱ्याकडुन न मिळालेले सुख त्या बाहेर शोधतात.. बऱ्याचदा त्यांना व्यक्त होता येत नाही त्यामुळे रागातुन ते व्यक्त होते..
फक्त मैत्रीत इतकं सगळं होइलच असं नाही.. त्या नात्याची दुसरी हिडन बाजु असु शकते . कधी कधी घरातही काही गोष्टी बोलल्या जात नाही.. लैगिकतेवर तर अजिबात चर्चा होत नाही आणि घुसमट होते.. हस्तमैथुन पाप समजुन केलं जात नाही किवा त्याचे दुष्परिणाम होतील या अज्ञानात काही मंडळी आपल्या इच्छा मारुन जगतात त्यामुळे कायमच त्या असमाधानी राहुन चिडचिड होते.. दोन दिवसापूर्वी मी एका ठिकाणी बसले असताना मी लैगिकतेवर बोलत होते आणि समोरची व्यक्ती इकडे तिकडे पहात होती .. कोणी ऐकतय का कोणी पहातय का ?? असं त्यांना वाटत होतं.. लपूनछपून सगळ्याना हवय फक्त उघडपणे बोलायचे पण नाही त्यामुळेच कोणीही समाधानी नाही , आनंदी नाही परिणामी आजार जवळ येतात.. आणि मग मेनोपॉज ( सखी ) ला कुरवाळत
आयुष्याचा आनंद संपवुन टाकतात..
माझ्या मित्राने त्याच्या मैत्रीचा सारासार विचार करावा त्यातुन त्याला त्रास होणार असेल तर एकतर तिच्याशीबोलुन पहावं नाहीतर स्वतःला घडवण्यात वेळ घालवावा.. आपला मौल्यवान वेळ नकारात्मक लोकांमधे कोणीही वाया घालवु नये.. वाचन करा.. भगवंताचे नाव घ्या.. तो आनंद आणि ज्ञान चिरकाल टिकणारे असते.. मैत्री करताना नकारात्मक लोकांना बाजूला केलेलं कधीही योग्य..

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *