धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे ) भारतात एकूण १६०० पेक्षाही जास्त भाषा अस्तित्वात होत्या. पण राजभाषा हिंदीमुळे आपणास स्वातंत्र्य
मिळावयास मोठी मदत झाली. असे प्रतिपादन प्रा डॉ सौ कोठूळे एम बी यांनी केले.
त्या येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या हिंदी दिवस कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ होळंबे टी एल होते.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की मेरी झाशी नहीं दुंगी, भारत छोडो, चले जावं ! ,तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा ; चलो दिल्ली ! या आणि इतर अशाच हिंदीतील घोषणाबाजीमुळे जनता प्रेरित झाली आणि स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाली. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात हिंदीचे स्थान मोलाचे आहे.
प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांनी सांगितले की हिंदी जशी सुशिक्षितांची भाषा आहे तशी ती अशिक्षितांचीही भाषा आहे. म्हणूनच आपणास हिंदी चित्रपटातील बरेचसे संवाद तोंडपाठ असतात. मन लावून प्रयत्न केला तर आपणास कोणतीही भाषा अवगत होते .असे सांगून त्यांनी संत कबिराचे आठ दहा दोहे श्रोत्यांना ऐकवले.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन करण्यात आले. प्रास्ताविक जंगिटवार व्हि आर यांनी केले. सुत्रसंचालन प्रा डॉ चाटे टी व्ही यांनी केले तर आभार प्रा नरवाडे एम व्ही यांनी मानले.