कंधार :- ( हनमंत मुसळे )
शहरातील स्टेट बँक आँफ इंडियाची शाखा असुन या बँकेतील कर्मचारी शासकीय नोकरदार, पेन्शनर, व्यापारी, शेतकरी आदि ग्राहकांना उर्मट बोलणे, उदट वागणे, त्याच्या बरोबर हुज्जत घालणे असा प्रकार नेहमी घडत असतो. कोणाकडे ही जा तक्रार करा असा दमही देतात खातेदारांच्या फाईल गहाळ करुन दुसरी फाईल तयार करा असे सांगतात.
खातेदारांना बँकेत कामानिमित्त जाण्यास धरकाप उडत असुन यामुळे कामाचा खोळबा उडालेला आहे. व दलालामार्फत गेलेल्या फाँईल माञ तात्काळ मंजूर करतात हम करे सौ कायदा चालू असुन या बँकेवर कुणाचेही अंकुश नसुन खातेदारांना अंतोनात ञास सहन करा लागत आहे.
बँकेचा असा मनमानी कारभार चालू आहे.
शासकिय कर्मचाऱ्यांनी नियमित हप्ते भरुन लोन संपले व नवीन लोन घेण्यासाठी गेले तर त्याच्या मनावर लोन मंजूर करणे, गोल्ड लोनसाठी दिवसभर बसवुन ठेवणे, कर्ज उचलताना अलग-अलग नियमावली सांगणे व कागदपत्रे सुध्दा अलग घेणे किंवा जास्तीचे सांगणे, एकाला एक नियम व दुसऱ्या दुसरा नियम, 5 लाख मंजुर लोन उचलण्यासाठी गेले असता 5 लाख नाहीत 2 दिवस अगोदर सांगावे लागते एवढी कँश बँकेत नाही.
असे सांगतात, लोनसाठी त्याच्या मनावर 2 किंवा 4 बाँड घेतात, घेतलेले कर्ज मुदतीच्या अगोदर फेडले तरी खातेदासोबत वाद निर्माण करुन त्याचे सिव्हील खराब करतात, लोन उचलताना पाँलिसी काढावी लागते म्हणून पैसे घेतात व लोन फिटल्यानंतर पाँलिसीचे पैसे परत करत नाहीत, शासकीय कर्मचाऱ्यांना घर दुरुस्ती (टाँप आँफ लोन) देत नाहीत त्याची ससेहोलपट करतात, तुमचा सहीचा नमुना बरोबर नाही म्हणून ञास देतात, शिक्षकांना 15 लाख लोन देत नाहीत त्याच्या मनावर लोन मंजूर करतात व उद्या या परवा या असे सांगून 10 ते 15 दिवस चकरा मारायला लावतात, खातेदार या कारभारामुळे फार वैतागून जातो, शेतकरी तर आदिच नापिकी, अतिवृष्टी, दुबार पेरणी यामुळे आर्थिक संकटात असताना मंजूर झाले कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. बँकेकडून खातेदारांना होणाऱ्या अडचणी व ञास लक्षात घेऊन बँकेत चालत असलेले मनमानी, दंडेलशाही, हुकूमशाही कारभार बंद करावा.
अनेक तक्रारी अर्ज देऊन सुध्दा काही एक फर पडत नाही तरी लोक प्रतिनिधीनी यात जातीने लक्ष घालुन खातेदारांना होणारा ञास तात्काळ बंद करावा अशी मागणी जोर धरत आहे.