समन्वयातून विकास कामावर भर द्यावा – खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड :- जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती देण्यासाठी सर्व विभागाचा समन्वय महत्वाचा आहे. एकमेकांच्या समन्वयातून विकास कामांची गती वाढविण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी प्रयत्नशिल असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.

डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

 

 

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे, प्रविण साले, सुरेशदादा गायकवाड, साहेबराव गायकवाड, मिलींद देशमुख, प्रतापराव पावडे, बंडू पावडे, श्रावण पाटील भिलवंडे, रंजनाताई व्यंकटराव कदम, विनायकराव शिंदे, बाबुराव देशमुख, सरपंच दिगंबर जगदंबे, सुभाषराव शिंदे, रविंद्र पोतगंटीवार, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विविध संबंधित विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

जिल्हा वार्षिक योजना, दलितवस्ती, तांडावस्ती अशा विविध योजनाच्या माध्यमातून निधी प्राप्त होतो. या निधीच्या माध्यमातून अनेक विकासात्मक कामे जिल्ह्यात सुरु असून काही प्रलंबित स्वरुपात आहेत. विकास कामे प्रलंबित राहील्यास निधी वेळेत खर्च होत नाही. परिणामी नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे विभाग प्रमुखांनी एकमेकात समन्वय ठेवून विकास कामांना गती द्यावी व कामे तात्काळ पूर्ण करावेत, असे निर्देश खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिले.

या बैठकीत जिल्ह्यातील मानसपूरी ते बहादरपूरा रोड – नॅशनल हायवे जोडून राहीलेल्या रस्ता, सिडको कॉर्नर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, नांदेड –उस्माननगर-हाळदा-मुखेड-बिदर रोड, कहाळा-गडगा रोड वरील मांजरम गावाजवळ शिल्लक राहिलेल्या रस्त्याचे काम, मांजरम-बेंद्री रोड वरील पानंद रस्त्यावर नाला काढणे, नायगाव तालुक्यातील सांगवी गावातील पिण्याचे पाणी व विविधा नागरी समस्या, नांदेड तालुक्यातील वाडी बु. नगरपंचायत आणि धर्माबाद तालुक्यातील कारेगांव फाटा येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयासंदर्भातील कामाबाबत या बैठकीत आढावा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आढावा घेतला. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त निधी वेळेत खर्च करुन विकास कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

नांदेड शहरात दोन एकर जागेवर पर्यटन विकासात भगवान गौतम बुध्दाचे स्मारक येत्या काळात उभारण्याचे नियोजन असून याबाबत मनपाच्या वतीने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे असे खासदार पाटील यांनी यावेळी सांगितले.

नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर झाले. या औचित्याने जिल्हाप्रशासनाच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *