काळजा तुला “ह्रदय” म्हणु का?……मन म्हणु….का दिल

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात ह्रदयाला अन्यन्य साधारण महत्व आहे.प्रत्येक जण ह्रदय तंदुरुस्त ठेवण्याकडेच कल असतो.खेडूत भाषेत म्हटल्या जाते काळीज एखादे कार्य हिंमतीने करणारा कोणी असेलतर त्याला निधड्या छातीचा किंवा हिंमतबाज म्हणुन समाज त्यांच्या कडे वेगळ्या नजरेने पाहते.

 

हे बोली भाषेत मोठ्या काळजाच म्हणन्याची हिंमत लागते.स्तूती करण्याचे झाल्यास तरी हे करण्यासाठी ह्रदय लागते. कांही जणतर भावनेने कंजुष असतात,त्यांना वाईटाचेही सोयीरसुतक नसते अन् चांगुलपणाचेही नसते.अतिव दु:ख असो का अती आनंद हे पचवण्याची शक्तीही ह्रदयातच असावी लागते.आई आणि ह्रदय यांचे चिखला मातीचा संबंधासम असते,उपमा अलंकाराने ह्रदयाच्या भावनेला शब्दबध्द करतांना अस्सल साहित्य किंवा काव्याचा जन्म होतो.

 

जर ह्रदय कणखर करावयाचे झाल्यास योग अन् प्राणायामची अत्यंत महत्वाचा आहे.
ह्रदय बिघडले तर।
ह्रदय रोग होतो॥
भावनेच्या आहरी।
भाननिक बनतो ॥
प्राणवायु त्याचा आहार।
व्यायामाने सुदृढ होतो॥
सिग्ध पदार्थांच्या सेवनाने।
कोलेस्ट्राॅल वाढत जातो॥
आईच्या ह्रदयी ममता।
वात्सल्यरुपी होतो॥
प्रेमवीरांच्या धडकनेत।
प्रेमाला उधाण आणतो॥
आज जागतिक ह्रदयाच्या दिनी कांही ह्रदयावर लेखन करावे या भावनेतून माझे मित्र जि.प.चे उपक्रमशील आदर्श शिक्षक सुनिलजी गवळे सर यांना व गुरुदेव विद्या मंदिरचे सेवानिवृत्त लेखनीक विश्वनाथजी गरुडकर या दोन बायपास सर्जरी झालेल्या ह्रदय रोगी पेशंटना जागतिक ह्रदय दिनाच्या फोनवर सदिच्छा देतांना हे टायटल सुचले…

 

 

अन् लागलीच लिहिण्यासाठी आरंभ केला.एकदा लिखान पुर्ण झाले अन् काॅपीचे बटन दाबण्या आधीच कटचे बटन दबले गेले.जे लेखन केले ते पुर्ण डिलीट झाले.मला एवढे फील झाले की दहा-वीस मिनिटे करमलेच नाही.मग विचार करुन सायंकाळी संत भगवान बाबा गडाकडे जावून परत लिहिण्यास आरंभ केला.ह्रदय हे शब्द कानी पडताच पहिल्या प्रथम आठवते ती आई या विषयावर अनेक कविनी,साहित्यिकांनी भरपुर लेखन केले.पण ह्रदयावर जेवढे लिहिले तेवढे कमीच आहे.

 

ह्रदय म्हणचे भावना जतन करण्याचे जणु लाॅकरच आहे असे मला वाटते.एकदा व्यक्ती अमानवी कृत्य केल्या नंतर समाज त्या क्रुर व्यक्तीस काय पाषाण ह्रदयी आहे असे म्हणतात!एखाद्या संत महात्म्यांनी सत्कृत्य करुन सत्संग केल्यास त्या महात्म्यांना माऊलीची दिली जाते.

 

तथागत गौतम बुध्दास तर करुणेचा महासागर म्हणटल्या जाते.त्यांनी विश्वशांतीसाठी उभं आयुष्य पणाला लावले.त्यांच्या ह्रदयातर करुना अथांग सागरागत साठलेली होती.आज घडीला विश्वात त्यांची करुणा आजरामर आहे.नारीशक्ती तर भावना प्रधान आहे.पुरुष अपवाद सोडल्यास पाषाण ह्रदयी असतात.

 

कोरोना महामारीच्या संकट समयी तर ह्रदयास लागणारे ऑक्सीजन लाख मोलाचा.त्या रोग्यांचे ऑक्सीजन लेवल मोजल्या जात आहे.पुर्वी आपण सिलेंटर ऑक्सीजनचे पाहत आलोत पण आता प्राणवायु टॅकरने पुरवठा केला जात आहे.पण नैसर्गिक प्राणवायु मानवासाठी अमृतासम आहे.

 

मानवाचे ह्रदय जन्मल्या पासून ते मृत्यू पर्यंत आयुष्यभर अविरत चालत असते.जीवन म्हणजे प्राणवायुवर तरलेले एक दवबिंदुचा थेंब आहे.कधी घरंगळून जाईल याचा नेम नाही.हिंदुह्रदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या ह्रदयावर बायपासची सर्जरी करत असतांना वैद्यराज विनु मांडके यांनी त्यांचे ह्रदय हाताळतांना सहजच म्हणटले की हिंदुह्रदय सम्राटांचे ह्रदय माझ्या हातात! ह्रदय दिसण्यास सर्वसामान्यां सारखे पण त्या ह्रदयाची हिंमत लाख मोलाची होती.

 

आजच्या दिनी ह्रदयाचा चांगुलपणा जन्मजात असला तरी तो आचरणात येवून तो वृध्दींगत करावा लागतो अन् आयुष्यभर सांभाळावा लागतो.
काय वाणु आता,न पुरे ही वाणी।ह्रदया चरणी,मस्तक ठेवी तसे॥

 

गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा,ता.कंधार व सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *