हस्तांतरण ठिक पण आता लवकर विमान सेवा सुरू करा – अशोकराव चव्हाण

नांदेड ः राज्यातील अन्य विमानतळांसह नांदेड येथील श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळाचे राज्य शासनाने खाजगी कंपनीकडून एमआयडीसीकडे हस्तांतरण करून विधानसभेत मी केलेल्या मागणीची पूर्तता केली आहे.

 

 

ही बाब जरी समाधानाची असली तरी इतक्यावर हे काम भागणार नाही. नांदेड येथे गुरु-त्ता-गद्दीच्या काळात 2008 मध्ये नाईट लँडिगसह अन्य सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या. रिलायन्स या खाजगी कंपनीकडे विमानतळ सपुर्द करण्यात आल्यानंतर यासर्व सुविधा बंद झाल्या होत्या. विमानतळाची योग्य ती देखभाल न केल्यामुळे नांदेडहून अन्य शहरांना जोडणारी विमानसेवा बंद पडली होती. त्यामुळे आता एमआयडीसीच्या माध्यमातून यासर्व सेवा पूर्ववत करण्यात याव्यात व अनेक वर्षांपासूनची नांदेड येथून मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद या शहरांना जोडणारी विमान सेवा सुरू करावी,

 

 

याची पुनर्मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *