प्रतिनिधी, कंधार
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आज शनिवारी, ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता श्री संत नामदेव महाराज मंगल कार्यालय, बस स्टँड जवळ, कंधार येथे ‘गाथा मुक्तीसंग्रामाची’ या नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
या नाटकातून मराठवाड्याच्या मुक्तीसीठी लढलेल्या भूमिपुत्रांच्या जाज्वल्य संग्रामाचा धगधगता इतिहास सांगितला जाणार आहे. सर्वांना प्रवेश विनामूल्य
असणार आहे.
यावेळी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुधाकर श्रृंगारे, लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
डॉ.सतीश साळुंके, अँड. शैलेश गोजमगुंडे यांनी या नाटकाचे लेखन केले आहे. विशेष प्रसंगकथन डॉ. नाथा चितळे, दिग्दर्शक आणि समन्वयक डॉ.नाथा चितळे, सादरकर्ती संस्था तन्मय ग्रुप, नांदेड असणार आहे.
सर्वांनी या नाटकाला उपस्थित राहावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, कंधारचे तहसीलदार राम बोरगांवकर यांनी केले आहे.