काउंसीलींग करत असताना अचंबित करणारे प्रश्न समोर येतात आणि त्यावेळी जाणवतं विचारांचे पोहे सुदाम्याच्या पोह्यासारखे असते तर..???किवा विचारांची खिचडी बिरबलाच्या खिचडीसारखी असते तर ??
मॅडम , माझं लिंग मोठं आहे त्यामुळे बायकोला त्रास होतो यावर उपाय सांगा हा प्रश्न असतो आणि उत्तर मिळाल्यानंतर पुढचा प्रश्न असतो , मॅड्म मला माझं लिंग अजुन मोठं करायचय काही उपाय आहे का ??.. मी म्हटलं कशासाठी ??
तुमच्या बायकोला त्रास होतो ना , त्यावर त्यांचं म्हणणं असतं माझ्या मैत्रीणीला मोठं आवडतं.. किती विरोधाभास, किती ती केविलवाणी धडपड , फालतु आत्मविश्वास , पुअर मेंटॅलीटी, बऱ्याच पुरुषांना वाटतं , आपलं लिंग मोठं म्हणजे आपण भारी..एखाद्या गोष्टीचा किती गर्व असावा ना .. लिंग मोठं आणि मनाचं काय ??.. विचारांचं काय ??.. मानसिकतेचं काय ??.. लिंग मोठं हे त्याच्या लक्षात राहिलं पण ती जेव्हा त्याच्याकडुन इतर अपेक्षा करते अगदी त्याने व्यसनं करु नये असेल किवा स्वच्छता असेल किवा अजुन काही त्या गोष्टी यांच्या का लक्षात येत नाहीत.. खरं तर या व्यक्तीच्या मानसिकतेवर कोणीही काम करु शकत नाही.. खरच अशा लोकांची किव येते .. अज्ञान म्हणु की अजून काही..
२१ वर्षांची मुलगी म्हणते , मला जान्हवी कपुर सारखे बुब्ज हवेत मॅम मी काय करु सांगा ना ?? मी काहीही करेन कारण माझा मित्र मला चपटी म्हणतो आणि इतर मुलींचे मोठे बुब्ज पाहून मला वाईट वाटतं , इतर मुलींकडे ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टी आपल्याकडे आहेत याचा खरं तर तिला आनंद व्हायला हवा.. आपल्याकडे असलेल्या गुणांची कदर आपणच करायला हवी ना.. सौंदर्य म्हणजे फक्त मोठे उरोज नाहीत तर उतम स्वभाव , कलागुण हे कायमस्वरूपीचे सौंदर्य आहे.. अशा मुलींच्या मित्रानेही या गोष्टीचा विचार करायला हवा.. आपण पटकन एखाद्याला बोलुन जातो पण त्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीच्या मानसिकतेवर काय परिणाम होइल याचा आपण विचार करत नाही..
एकंदरीतकाय तर वाचन कमी , विचारांची देवाणघेवाण नाही, चुक आणि बरोबर याची पोच नाही.. आयुष्यात आपल्याला काय मिळवायचय याचं प्लॅनींग नाही..आणि चुकीच्या लोकांच्या सानिध्यात राहुन अर्धवट माहीतीच्या आधारे बांधलेले आराखडे नंतर नैराश्यचं कारण ठरतात..
चांगलं वाचा.. चांगला विचार करा.. आणि रोज व्यायाम करा..
सोनल गोडबोले
…..