मुखेड -अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. स्पर्धा परीक्षेसाठी मग ती महाराष्ट्र राज्याची किंवा केंद्रीय पातळीवरील परीक्षा असो तसेच बँकिंग व इतर विविध परीक्षांसाठी अर्थशास्त्र हा महत्त्वाचा विषय आहे. तेंव्हा विद्यार्थ्यांनी या विषयाचा सांगोपांग अभ्यास करावा जेणेकरून भविष्यात विविध क्षेत्रातील संधी तुम्हास प्राप्त होतील असे प्रतिपादन संभाजीराव केंद्रे महाविद्यालय जळकोट येथील प्रा.डाॅ. संजय मुंडकर यांनी ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय, वसंतनगर ता.मुखेड येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळ उद्घाटन व अतिथी व्याख्यान प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
यावेळी अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड म्हणाले की अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मंडळाकडून विविध उपक्रम घ्यावेत तसेच भित्तीपत्रक प्रसिद्ध करावे.ज्याद्वारे विविध शाखेतील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुण कुमार थोरवे यांनी करून कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका विस्ताराने विशद केली व प्रमुख पाहुण्यांचा सविस्तर परिचय करून दिला.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा.डाॅ.देविदास पवार यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ही पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डाॅ. एस. के.देठे यांना मराठवाडा क्रीडा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अर्थशास्त्र अभ्यास मंडळातील सर्व सदस्यांचा सत्कारही करण्यात आला. ज्यात रितेश गायकवाड ( अध्यक्ष) किशोर ईटकापल्ले (उपाध्यक्ष) काचेबोईनवाढ प्रकाश ( सचिव )कु. मानसी गुंडावार (सहसचिव) कु. सोनकांबळे वंदना मुंडकर शिवशंकर,पांचाळ पांडुरंग, कु.कल्याणकर पल्लवी,कु. बिरादार प्रतीक्षा, सोनकांबळे सिद्धार्थ, भारदे सिद्धोधन (सदस्य)
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व काही प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार याच विभागात कार्यरत प्रा.डाॅ. नागनाथ शेटकार यांनी केले.