मिशन मधुमेह मुक्त भारत या प्रोजेक्ट अंतर्गत रविवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जगद्विख्यात आयुर्वेदाचार्य डॉक्टर दिनेश काछा अहमदाबाद यांचे मधुमेह परतावा सेमिनार ठेवण्यात आले असल्याची माहिती संयोजक लॉ. करुणा प्रविण अग्रवाल,सह-संयोजक लॉ. सुनिता अमरसिंह चौहान यांनी दिली आहे.
लॉयन्स क्लब नांदेड मिडटाऊन, लॉयन्स नांदेड मिडटाऊन फौंडेशन,लॉयन्स क्लब नांदेड, लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल, लॉयन्स क्लब नांदेड सफायर यांच्या संयुक्त विद्यामाने ठेवण्यात आलेल्या सेमिनारला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील व माजी मंत्री डी.पी.सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.मधुमेह रुग्णांसाठी हे सेमिनार निशुल्क असून नांदेड जिल्ह्यातील सर्व मधुमेह रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स परिवारातर्फे करण्यात आले आहे.