‘मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको’ ही मराठा क्रांती मोर्चाची भूमिका योग्य आहे. मराठा आरक्षणाला कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, पण ते ओबीसीमधून नको. हीच ओबीसी नेत्यांची देखिल भूमिका आहे आणि ती रास्त आहे. मात्र याचा अर्थ मराठा आरक्षणाला ओबीसींचा विरोध आहे, असा होत नाही. पण तरीही काही लोक तसा कांगावा करतांना दिसतात, हे दुर्दैवी चित्र आहे. ती समाजाची दिशाभूल आहे. असले प्रकार टाळायला हवेत! ते कुणाच्याही फायद्याचे नाहीत.
ओबीसींची जातनिहाय जनगणना हाच त्यावर उपाय आहे, असे वाटते. संख्येनुसार आरक्षण देणे त्यामुळे सोपे जाईल. त्यासाठी मराठा नेत्यांनी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे. सहकार्य केले पाहिजे. भाजपाच्या कारस्थानाला कुणीही बळी पडू नये. यातच भले आहे.
–
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर अभियान