कॉफी आणि बरच काही.. कॉफी आणि रोमॅन्टिक डेट
कॉफी आणि मित्र , कॉफी आणि पाऊस, अर्धा कप कॉफीत दोन दोन तास गप्पा , कॉफी आणि कट्टा , कॉफी आणि त्याची वेगवेगळी रेंज ..
२० रुपयाची कट्ट्यावरील नेसकिवा बृ कॉफी जिथे फक्त खुर्च्या आहेत.. रोमॅन्टिक गप्पा शेजारील व्यक्तीला ऐकु जातात.. अरसिक व्यक्ती आणि जिच्या हातुन ५० रुपये सुटु शकत नाही अशाना ही कॉफी वरदान आहे किवा गृपला दंगा घालायला.. , एखाद्या ब्रॅंडची ५० रुपयाची कॉफी म्हणजे टेबल येतं , प्रिंटेड बील येतं, जिथे निवांत गप्पा मारता येतात पण एखादी अरसिक व्यक्ती मग उचलून तोंडाला लावते आणि टपकन शॉट सारखी गरम कॉफी पिते तेव्हा मात्र माझ्यासारखी रसिक व्यक्ती हतबल होते.. त्यावेळी त्या कॉफीचाही अपमान होतो.. त्या जागेचाही अपमान होतो आणि त्या व्यक्तीच्या अरसिकतेची किव येते.. मला प्रत्येक कॉफीच्या घोटात रमायला आवडतं , पाव कप कॉफीतही माझं समाधान होतं.. सुर्र के पिओ हे चहाच्या बाबतीत ठिक आहे पण कॉफीत मादकता हवी, कॉफी पिताना प्रेयसीच्या डोळ्यात दिसणारी धुंधी पहाण्याची क्षमता हवी.. कॉफी देणाऱ्याबद्दल कृतज्ञता हवी..
आणि त्याही पुढे जाऊन जेव्हा १५० ते २५० रुपयाचा कॉफीचा मग हातात येतो आणि त्यावर हार्ट काढलेलं असतं तेव्हा मात्र तेच हार्ट बंद तर पडणार नाही ना याची खबरदारी तो प्रियकर घेतो.. कारण अर्ध पाणी , अर्ध दुध आणि कडु कॉफीच्या बियानी ती इतकी कडु असते की माझ्यासारखी रसिक म्हणते त्यापेक्षा स्पर्म कमी कडु असतात रे .. त्या कॉफीचा एक घोट सगळ्या डेट चा विचका करतो आणि एवढी मोठी लुट ( पैशाची ) झाल्याचा पश्चाताप होतो.. बऱ्याच लोकांना फिल्टर कडु कॉफी आवडते पण मी मात्र माइल्ड कॉफीत रमते.. कडु कॉफी पित ambience चा आनंद घेत
आणि एकाच कपात कॉफी पित प्रियकराच्या जवळ बसण्याची मज्जा घेत कडुपणा विसरत , उद्या वेगळी कॉफी ट्राय करु म्हणत दोघेही मनसोक्त हसतात आणि माझ्यातील लेखिका ते क्षण अचुक शब्दात टिपते… कॅपेचिनो काय किवा अजुन काहीतरी .. कॉफी आणि बरच काही हेच खरं..
पावसाळ्यात आणि थंडीत जी दोघांना जास्त जवळ आणते ती कॉफी असते.. कॅफीत जे बरचकाही आहे ते शोधण्याचा फुकटचा अट्टाहास करु नये कारण ते आत असावं लागतं..
सोनल गोडबोले