कंधार ; प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाचनालयातर्फे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये दि.१५.१०. २०२३ रोजी रविवारी सकाळी १० वाजता डॉ. ए. पी. जे. कलाम यांच्या निवडक ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम डॉ. ए. पी. जे. कलाम यांच्या प्रतिमेस मोहम्मद रफिक स. ग्रंथपाल व श्री दत्ता ऐनवाड लिपीक, यांनी पुष्पहार अर्पण केले, तसेच उपस्थित वाचकांनी ही पुष्प अर्पण केले. यावेळी मोहम्मद रफिक सत्तार स. ग्रंथपाल यांनी डॉ.ए. पी. जे. कलाम यांच्या जीवनकार्यावर माहिती दिली.
कार्यक्रमास मोठ्या संख्येत वाचक वर्ग उपस्थित होता. तसेच प्रदर्शनास श्री रामरावजी पवार माजी अध्यक्ष न.प.कंधार, श्री व्ही.के. कांबळे माजी अध्यक्ष न प.लोहा, श्री वाय.बी. महाबळे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, श्री इ.जे. बनसोडे सेवा निवृत्त शिक्षक, यांनी भेट दिली.
तसेच वाचनालयाच्या अभ्यासिकेतील स्पर्धात्मक परिक्षेची तयारी
करणा-या विद्यार्थ्यांसाठी दि.१६/१०/२०२३ रोजी सोमवारी दुपारी ०३ वाजता मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री राम बोरगावकर तहसीलदार, व श्री विलास रिनायत शाखाधिकारी एसबीआय कंधार, यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. एपीजे कलाम, तसेच सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. तसेच वाचकांच्या वतीने मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे यांचे शाल पुष्पहाराने सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे श्री विलास रिनायत साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाने केली तसेच श्रीराम बोरगावकर सर यांनी शाखा अधिकारी यांना बँकेमार्फत वाचनालयासाठी आरो प्लांट दान स्वरूपात देण्याची केलेली मागणी मान्य झाली असून वाचनालयास लवकरच आरो प्लांट देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यानंतर कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री राम बोरगांवकर साहेब तहसीलदार तथा कंधार नगरपरिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले.
यावेळी मोहम्मद रफीक सत्तार स. ग्रंथपाल यांनी प्रमुखाचे स्वागत व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास श्री बालाजी केंद्रे तलाठी, श्री गरुडकर सर, श्री सचिन मोरे, सह मोठया संख्येत वाचक वर्ग उपस्थित होते. तसेच न.प. कर्मचारी श्री जितेंद्र ठेवरे का. नि. स., दत्ता माधव ऐनवाड, मिलिंद महाराज, श्रीमती कमलबाई जाधव, प्रकाश गुंडेकर हे उपस्थित होते.