park ..in …. ing… .. पार्कींग

park ..in …. ing…
.. पार्कींग हा शब्द आपण गाड्यांच्य बाबत वापरतो पण हा शब्द अजुन बऱ्याच ठिकाणी वापरता येइल का??
प्रयत्न करायला काय हरकत आहे ना ..
Park in .. काही गोष्टी आपण आतल्या आत पार्क करुयात म्हणजेच आपण कोणासाठी काहीही केलेलं आणि कोणाला काहीही दिलेलं . आतल्या आत जिरवुन टाकुयात.. आपल्या आनंदासाठी आपण काही गोष्टी करतो म्हणजेच उदाहरणार्थ दुसऱ्याचा वाढदिवस साजरा करणं असेल , त्याने आपलाही करावा ही भावना अजिबात नसावी आणि चुकुन मनात आलीच तर पार्कइन करुयात.. मी भगवद्गीता वाचत असूनही जितका पाहिजे तितका मोह आवरत नाही किवा नकळत काहीतरी बोललं जातं , लगेच लक्षात आल्यावर माफीही मागते… अशा अनेक गोष्टी कायमस्वरुपी आतल्या आत पार्क करता येतात का याचा प्रयत्न मी सतत करत असते.. बाहेर का नाही फेकायच्या कारण त्याची दुसरीकडे घाण नको .. आतल्या आत जिरवुन उत्तम विचारांचं खत . तयार करुन ते आपल्या मनाला घालुन मनाने तंदुरुस्त व्हायला या खताचा चांगला उपयोग होवु शकतो.. यावर प्रत्येकाने काय काय जिरवता येइल याचा विचार करा.. अपमान पचवु शकतो, कोणीही आपल्यावर केलेल्या टिका ( दोन्ही अर्थाने ) याही पार्कइन करु शकतो.. पहा विचार करुन..
आता पार्कींगकडे वळुयात .. काही जणाना मर्सीजीड पार्क करायची असेल तर काहीना टुव्हीलर .. दोघीना स्पेस वेगवेगळी लागेल पण कधीतरी गल्ली बोळात जायला टुव्हीलर बरी पडते त्यामुळे तिला कमी न समजता आणि मर्सीडीज ला मोठी न समजता इकडून तिकडे जाण्याचे ते माध्यम आहे हेच समजायचय.. गेल्याच आठवड्यात पुणे वाराणसी डिरेक्ट फ्लाइट होतं आणि येतांना तीन फ्लाइट बदलायला लागल्या.. त्यावेळी जाणवलं तीन वेळा मी ३७००० फुटावर हवेत होते पण तिन्ही वेळा मला जमीनीवर यावच लागलं हीच आपली खरी ओळख .. विमान पार्क होताना पाहिलं आणि म्हटलं ,अशीच टेंशन्स , दुख आपल्याला बाजूला पार्क करुन त्या सिचुएशनकडे नव्याने पहाता यायला हवं… एका निर्जीव वस्तुने किती मोठा धडा शिकवला ना.. आयुष्यात अनेक गोष्टीना आपण काही काळापुरतं बाजूला पार्क केलं तर प्रत्येकजण सुखी होइल.. पार्कींग कुठेही शोधायची गरज नाही ते आपल्याच शेजारी आहे.. फक्त ing की in या दोन्हीतला फरक लक्षात आलं की झालं.. काही गोष्टी आत मुरवायच्या आणि काही बाहेर ..
Life is beautifulll..मजेत जगा.. अर्थात दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेत .. अनेक माझे वाचक माझ्या रोजच्या लिखाणाची वाट पहात असतात .. एखाद्या दिवस माझ्याकडून काही दिलं गेलं नाही तर लगेच अनेक मेसेजेस येतात. हाच आपल्यातला दुवा आहे आणि त्या भगवंताचे आभार कारण माझ्याकडून रोज नवीन विषय तो लिहुन घेतो..
माझ्या वाचकांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते.. वैयक्तिक कोणाशी संपर्क ठेवता येत नाही त्याबद्दल दिलगीरी..

 

 

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *