धर्मापुरी ( प्रतिनिधी ) येथील कै शं गु ग्रामीण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात दि १६ आँक्टो २३ रोजी माजी राष्ट्रपती, मिसाईल मँन आँफ इंडिया, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करतात.
या निमित्तानं प्रा दराडे जी एस यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ होळंबे टी एल होते. संस्थाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रंथालय विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमात वनस्पतीशास्त्र विभागातर्फे ग्रंथालयास ११ ग्रंथ भेट देण्यात आले. या ग्रंथ प्रदर्शनास विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भेट दिली.