कंधार/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य क्रीडा संचनालय पुणे व नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या. जिल्हास्तरीय स्पर्धेत कंधार येथील श्री शिवाजी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.
कु.वैष्णवी मठपती हिने उंचउडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. पवार राजेश या विद्यार्थ्यांनी ८०० मीटर व १५०० मीटर धावणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला,डांगे गजानन या विद्यार्थ्यांनी ६ कि.मी. धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला, घुगे सुरज या विद्यार्थ्यांनी ६ कि.मी. धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला,केंद्रे बळीराम या विद्यार्थ्यांनी सहा कि.मी.धावणे स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविला,बिरादार महेश या विद्यार्थ्यांनी थाळीफेक या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला.
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन क्रीडा मार्गदर्शक प्रा.शिवराज चिवडे यांनी केले. सदरील विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे,संस्थेचे सचिव माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे,संस्थेचे सहसचिव ॲड .मुक्तेश्वरराव धोंडगे, संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव पेटकर,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुर्यकांत जोगदंड, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धर्मापुरीकर,पर्यवेक्षक प्रा. प्रदीप गरुडकर क्रीडा मार्गदर्शक प्रा. शिवराज चिवडे व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या खेळाडूंचे अभिनंदन करून विभागस्तरीय खेळासाठी शुभेच्छा दिल्या.