अहमदपूर ( प्रतिनिधी ) आपल्या आंदोलनास , सकल मराठा आरक्षण लढ्याला तब्बल ४० दिवस उलटले आहेत.सकल मराठा आरक्षण लढा आता निर्णायक परिस्थितीत आहे. निराशा येणे साहजिकच आहे. पण तुम्ही निराश होऊ नका. कारण त्यामुळे विरोधकांचे फावते, त्यांचे राजकारण यशस्वी होते. आपल्या लढ्याची हार होते. असे प्रतिपादन मराठा महासंघाचे कार्यकर्ते प्रा नानासाहेब कदम यांनी केले.
ते येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित साखळी उपोषणस्थळी उपोषणाला बसलेल्या समाज बांधवांना उद्देशून मार्गदर्शन करत होते.दि २२ आँक्टो २३ रोजी या उपोषणाचा ४० वा दिवस होता. मानखेड, कोपरा आणि आंबेगावचे गावकरी नागरिक आणि समाजबांधव आज या आंदोलनात सहभागी झाले होते.
पुढे बोलताना ते म्हणाले होते सकल मराठा समाजास सरसकट आणि टिकणारे आरक्षण देण्यात यावे।या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या या लढ्याचा आज ४० वा दिवस आहे.आपण निराश होऊन चालणार नाही. आपण निराश झालो तर विरोधकांचे फावणार आहे. त्यांचे राजकारण यशस्वी होणार आहे. आणि आपली मागणी मात्र प्रलंबित राहणार आहे.प्रश्न अनुत्तरीत राहणार आहे. तेंव्हा निराश होऊ नका.जरांगे पाटील सांगतात की संयम सोडू नका. निर्धार ढळू देऊ नका. शांततेत आंदोलन सुरू ठेवा. यश मिळणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लढा यशस्वी होणार आहे. असेही शेवटी ते म्हणाले.