(कंधार ; प्रतिनिधी )
सामाजिक बांधिलकी जपत मन्याडखोऱ्यातील युवा नेतृत्व प्रा. डॉ. भाई पुरुषोत्तम धोंडगे यांनी अंतरवली सराटी येथील जाहिर सभेत उष्मघाताने मृत्यू पावलेल्या बीड जिल्ह्यातील गेवराई येथील विलास पवार याच्या परिवाराची भेट घेऊन १ लक्ष रुपयाची मदत केली.
मन्याड खोर्यातील उदयोन्मुख युवा नेतृत्व म्हणून प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांची ओळख आहे.
गरजवंतास मदत करण्यास ते नेहमी तत्पर असतात. आजपर्यंत त्यांनी अनेक गरजवंतास सढळहस्ते मदत केली आहे. सामाजिक बांधिलकीतून मानवता धर्म जपल्यामुळे त्यांना लोकशाही न्यूज चॅनलने लोकशाही सन्मान पुरस्कार देवून नुकताच गौरव केला आहे.
अंतरवली सराटी येथे संपन्न झालेल्या मराठा आरक्षणाच्या विराट सभेच्या वेळी उष्माघाताने हौतात्म्य पत्करलेल्या गेवराई जिल्हा बीड येथील विलास शिवाजीराव पवार यांच्या घरी जाऊन प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले व १ लक्ष रुपयाची मदत केली.
नांदेड मराठा समुहाने केलेल्या आव्हानानुसार मी माझ्यावतीने पवार याच्या पत्नीला १ लक्ष रुपयाचा धनादेश देऊन एक भाऊ या नात्याने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना श्यक्य असेल त्यांनी आपल्या परीने या निराधार कुटुंबाला आधार देण्याचे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.