आरोग्यम धनसंपदा..

 

रोजच्या सवयीनुसार साडेपाच वाजता रनींगला निघाले आणि रोजचा रस्ता भयावह दिसला… रस्त्यावर पडलेले फटाक्यांचे बॉक्सेस , प्लॅस्टिक पिशव्या , जळालेले फटाके सगळं पाहुन सफाई कामगार डोळ्यासमोर आले.. आपण चार दिवस सुट्टी घेउन दिवाळी साजरी करणार आणि ते आज आपण केलेली घाण साफ करणार… त्यांच्या सुट्टीचं काय ??त्यांच्या आरोग्याचं काय ??….
गणपती , दिवाळी हे सण आपण साजरे करतो आणि त्याचा त्रास प्राणी , पक्षी म्हणजेच पर्यायाने निसर्गाला होतो..

प्राणी घाबरून लपुन बसतात .. फटाक्यातुन पडणारं केमिकल्स प्राणी , पक्ष्यांच्या पोटातही जाऊ शकतं.. हजारो रुपयांचा चुराडा आणि एकीकडे अनेक लोक उपाशी किती विरोधाभास.. खरं तर आपण सण साजरे करण्यामागची कारणेच कधी जाणुन घेत नाही.. लक्ष्मी पूजन म्हणजेच धनाची पूजा म्हणजेच आरोग्याची पूजा.. कुटुंब नातेवाईक मित्र परिवार यांनी एकत्र येउन गप्पा ,,शेअरिंग केअरिंग आणि घरी केलेला फराळ एकत्र बसुन खाणं आणि एकमेकांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणं.. गणपतीच्या बाबतीतही हेच..
आनंदाच्या व्याख्या बदलल्या आणि इतरांच्या आणि स्वतःच्या आरोग्याला धोका निर्माण झाला..

चुक कोणाची ??.. फटाके , दारु , सिगरेट तयार करणाऱ्याची की आपली ??.. मला कायम वाटतं आपलीच..
कारण तयार करणारा आपल्या मागे लागत नाही आपण तिथे जाऊन ही घाण घरात घेउन येतो आणि पर्यावरण आणि आरोग्य खराब करतो.. प्रत्येकाने ठरवलं मी हे विकत घेणार नाही तर कंपन्या आपोआप बंद होतील.. सण साजरे करण्यावर आक्षेप नाही तो चुकीच्या पध्दतीने साजरा होतो याचं वाईट वाटतं..
आपण प्रत्येकाने हे प्रश्न स्वतःला विचारुयात आणि उत्तरे काय मिळतात पाहुयात..
मी कष्टाने कमावलेले पैसे काल फटाक्यात जाळले का ??
माझं उत्तर नाही आलं..

माझ्यामुळे प्रदूषणात वाढ झाली का ??
पुन्हा उत्तर नाही आले..
माझ्यामुळे प्राणी पक्षी यांना आवाजाचा त्रास झाला का ??
मी फटाके फोडलेच नाहीत तर कसा होइल ..
माझ्यामुळे वयस्कर , आजारी , लहान मुलं यांना त्रास झाला का ??
नाही..
मग मी दिवाळी कशी साजरी केलीआणि त्यातुन आनंद मिळाला का ??
कुटुंब एकत्र होतं, अनेक मित्र परिवार घरी येउन गप्पा मारुन खाऊ खाऊन गेला त्यामुळे फक्त आनंद आणि आनंदच झाला..

आज सकाळी धावताना मी हाच विचार करुन स्वतःची कृतज्ञता व्यक्त केली कारण मी काहीही चुकीची वागले नाही..
आणि मला वाटतं हाच खरा आनंद..
आता ज्यानी फटाके फोडले आणि माझा लेख वाचुन त्रास झाला तर सफाई कामगारांची माफी मागा आणि पुन्हा करणार नाही हे स्वतःलाच सांगा…
प्रत्येकाने फक्त आपल्यासाठीच हे करायचं आहे..
आता कोणीतरी म्हणेल , की फटाके विकणाऱ्याला पैसे मिळाले .. बरोबर आहे पण फटाके नसतील तर तो पोटासाठी अजुन काहीतरी चांगले काम करेल कारण हा धंदा बाराही महिने चालणारा नाही .. इच्छा तिथे मार्ग.. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण कसे वागतो.. रस्त्यावर थुंकणं असेल , रस्त्याच्या बाजूला कचरा फेकणं असेल यावर प्रत्येकाने विचार करायचा आहे.

#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *