मिर्झा अथर बेग यांनी गाजविली दिल्लीची राष्ट्रीय स्पर्धा रेनॉल्ड शुटर पुरस्कार पटकवला कंधारच्या पहिला राष्ट्रीय रेनॉल्ड शूटर

 

कंधार  ( दिगांबर वाघमारे )

तालुक्यातील कोटबाजारचे भूमिपुत्र मिर्झा अथर बेग मिर्झा जफरउल्ला बेग यांना दिल्ली येथे रायफल शूटिंगमध्ये रेनॉल्ड शूटर पुरस्काराने सन्मानित केले असून त्याच्या माध्यमातून कंधारचे नाव राष्ट्रीय पातळीवर चमकले आहे.

अथर बेग यांना लहानपणापासूनच रायफल शूटिंगचा छंद होता तो छंद कॉलेज जीवनात त्यांनी आपले ध्येय करून सातत्याने रायफल शूटिंग स्पर्धेत सहभाग घेतला, अथरबेग यांनी जिल्हा स्पर्धेत बाजी मारल्याने त्यांची राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी हैदराबाद येथे निवड झाली. या रेनॉल्ड नेमबाज स्पर्धेत ६०० पैकी ५६४ गुण बाजी मारल्याने राष्ट्रीय स्पर्धेत पात्र झाले.

 

 

राष्ट्रीय रेनॉल्ड नेमबाज स्पर्धेसाठी केरळ राज्यातील तिरुंदपूरम येथे रेनॉल्ड नेमबाज स्पर्धा झाली या स्पर्धेत त्यांनी ६०० पैकी ५७५ गुण घेऊन स्पर्धे जिंकून दिल्ली येथे राष्ट्रीय रेनॉल्ड नेमबाज स्पर्धेत २०२३ साठी पात्र झाले. दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीवरील ५० मीटर रायफल शूटिंगमध्ये ६०० पैकी ५९५ गुण घेऊन नॅशनल रेनॉल्ड शूटरचा तो मानकरी ठरला आहे. त्यामुळे दिल्ली येथे झालेल्या ६६ व्या राष्ट्रीय नेमबाजा चॅम्पियनशिप स्पर्धेत नुकतेच त्यांना रेनॉल्ड शूटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १५ ते २४ नोव्हेंबर या कालावधीमध्ये दिल्ली येथे झालेल्या ६६ व्या आंतरराष्ट्रीय नेमबाज स्पर्धेमध्ये ५० मीटर प्रोन पुरुष वैयक्तिक स्पर्धेतून अथर बेग यांनी रेनॉल्ड रायफल शूटिंग या स्पर्धेमध्ये नेत्रदीपव कामगिरी केली.

 

 

हैदराबादचे शूटर अहमद खान व नांदेडचे विकीसिंग मेजर यांनी कोचची भूमिका पारपडली. त्यांच्या या कामगिरीचे अनेकांनी कौतुक केले आहे.

राष्ट्रीय रेनॉल्ड नेमबाजी स्पर्धेत ॲड. मिर्झा अथर बेग यांनी कंधारचे नाव राष्ट्रीय स्पर्धा नेल्याने दिल्ली, हैदराबाद, नांदेड येथे भव्य स्वागत करण्यात आले. कोटबाजार येथे मंगळवार दि.२८ रोजी रात्री कोटबाजार ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी व शिवसेनेचे नेते एकनाथ पवार, माजी नगराध्यक्ष मोहम्मद जफरोद्दीन यांनी मिर्झा अथर बेग यांच्या सत्कार केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *