नांदेड ; मायेची उब या उपक्रमाच्या पाचव्या वर्षी चाळीस दिवस मध्यरात्री फिरून नांदेड शहरात विविध रस्त्यावर कुडकुडत पडणाऱ्या बेघरांच्या अंगावर २०२४ ब्लॅंकेट देणगीदारांच्या हस्ते लोकसहभागातून वाटप करण्यात येणार असून या उपक्रमासाठी दात्यांनी सहकार्य करावे असे आवाहन संयोजक भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी केले आहे.
गेल्या ४ वर्षापासून जे वर्ष असेल तितक्या संख्येचे ब्लॅंकेट वाटप करण्यात आले आहे.आता भाजपा महानगर नांदेड आणि सन्मित्र फाउंडेशन नांदेड व लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे खा.चिखलीकर, भाजप महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, लायन्सचे योगेश जायस्वाल, डॉ.दी.बा.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी वर्ष २०२४ असल्यामुळे नांदेड जिल्ह्यात एकूण २०२४ ब्लॅंकेट वाटण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी ४० रात्री फिरून रस्त्यावर झोपलेल्या निराधारांच्या अंगावर ब्लॅंकेट टाकण्यात येते.लुधियाना येथील कारखान्यातून घाऊक स्वरूपात ब्लॅंकेट मागण्यात येत असून एका ब्लॅंकेटचे वजन एक किलो पेक्षा जास्त आहे.एका ब्लॅंकेट ला रबर प्रिंटच्या छपाई सह दोनशे रुपये शुल्क लागणार आहे.किमान वीस ब्लॅंकेट साठी चार हजार रुपये खर्च येणार आहे. रबर प्रिंट करण्याचा उद्देश असा आहे की, काही निराधार मिळालेल्या वस्तू दुकानदारांना परत विकतात. त्यामुळे मूळ उद्देश बाजूला रहातो.कमीत कमी वीस ब्लॅंकेट देणाऱ्या दात्यांचे नाव रबर प्रिंट द्वारे ब्लॅंकेट वर टाकून त्याच देणगीदारांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे.समाज माध्यमाद्वारे ब्लॅंकेट देणाऱ्या दानशूर नागरिकांची यादी उपक्रम संपेपर्यंत दररोज प्रसिद्ध करण्यात येणार असून पन्नास हजार नागरिकापर्यंत दात्यांची माहिती पोंहचणार आहे.
सन्मित्र फाउंडेशन नांदेड यांनी १००,ॲड.दिलीप ठाकूर यांनी ५०, तर एका अज्ञात दात्याने ४० ब्लॅंकेट दिलेली आहेत.स्नेहलता जायसवाल हैद्राबाद व विश्वजीत मारोती कदम धानोरा कोठा यांनी प्रत्येकी २५ ब्लॅंकेट वितरणासाठी नोंदणी केली आहे.प्रत्येकी २० ब्लँकेट देणाऱ्या मध्ये प्रा. रमेशचंद्र जायसवाल चोपडा,रमेश सितारामजी सारडा पवन ट्रेडर्स नांदेड,कै.अनुराधा व कै.डाॅ.नीलकंठराव मजगे लातूर यांच्या स्मरणार्थ मोदी व मजगे परिवार,जबडे सुधाकर रामराव देगलुर,मोहित व रेणुका जयप्रकाश सोनी,कै.कमलबाई शंकरराव लापशेटवार यांच्या स्मरणार्थ राजू शंकरराव लापशेटवार कुंडलवाडी,अमोल धुळे,नंदिनी संजीवन पुणेकर,प्रमिला महेश भालके यांचा समावेश आहे. उद्दिष्ट पूर्तीसाठी आणखी १६०४ ब्लॅंकेट ची आवश्यकता आहे.तरी ज्यांना ब्लॅंकेट साठी निधी द्यायचा असेल त्यांनी कृपया ९४२१८ ३९३३३ या नंबर वर गुगल पे अथवा फोन पे वर रक्कम पाठवावी असे आवाहन
अरुणकुमार काबरा, कामाजी सरोदे, सुरेश शर्मा, ॲड.उमेश मेगदे, शिवाजी पाटील, सुनील साबू, सुरेश निलावार,ॲड. बी.एच.निरणे,गणेश उंद्रे, संतोष भारती,सोमेश उंद्रे, सविता काबरा, राजेशसिंह ठाकूर यांनी केले आहे.