दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतनच्या वतीने कंधार तालुक्यात करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबीर

 

कंधार ( दिगांबर वाघमारे )

राज्य तंत्रशिक्षण संचालनालय मार्फत करिअर मार्गदर्शन व समुपदेश अभियान बाबत तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांचे वतीने महाराष्ट्रात स्कुल कनेक्ट कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत इयत्ता दहावी व बारावीत शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व समुपदेश कार्यशाळा घेण्यात यावी असं तंत्रशिक्षण संचालनालय म.राज्य यांचेकडून कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार कंधार तालुक्यातील विविध शाळा विद्यालयात शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथिल प्रा राघवेंद्र बिलोलीकर यांनी व त्यांच्या पथकांनी मार्गदर्शन केले .

सदर कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणा-या कार्यशाळेत विदयार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षणासाठीचे उपलब्ध अभ्यासक्रम, संस्था निवडीचे निकष, नोकरी व उदयोगधंदयांच्या संधी, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती ई. माहिती नांदेड जिल्हयातील विदयार्थ्यांना शासकीय तंत्रनिकेतन नादेड यांचे मार्फत दि.०१/१२/२०२३ पासून विनामुल्य दिली जात आहे.

कंधार तालुक्यातील नांदेड जिल्हयातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व विद्यार्थांनी लाभ घेऊन सहकार्य करावे असे आवाहन पथक प्रमुख राघवेंद्र बिलोलीकर यांनी केले .
यावेळी गणपतराव मोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वागलगावे , शिक्षक निळकंठ लुंगारे , शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथिल विजय फुलवळकर , शंकर परोडवाड , बालाजी उगले आदींसह शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते .

 

 

दि. ०१/१२/२०२३ पासून शालेय वेळेत शासकीय तंत्रनिकेतन नांदेड यांची टीम जिल्हयातील सर्व शाळाना भेटी देवून वरील प्रमाणे कार्यवाही करणार आहेत. त्यानुसार शाळेच्या वेळेमध्ये इयत्ता १० वी व १२ वींचे विदयार्थ्यांना सदर कार्यशाळेसाठी शाळा, उमावि/कमावि मध्ये उपस्थित राहतील याप्रमाणे नियोजन करुन संबंधित टीमला सहकार्य करावे.

(प्रशांत दिग्रसकर) शिक्षणाधिकारी (मा.) जिल्हा परिषद, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *