कंधार ; प्रतिनिधी
गटसाधन केंद्र कंधार यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात येथील रविंद्रनाथ टागोर प्राथमिक शाळेने यश मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला आहे, वर्ग सातवी वर्गातील विद्यार्थीनी अक्षरा कमलेश टेंभुर्णेवार, लक्ष्मी दाऊ मेकलवाड या विद्यार्थिनींनी बनवलेल्या आधुनिक बिगरमाती शेती या प्रयोगाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
पंचायत समिती गटसाधन केंद्र कंधार यांच्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रदर्शनचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी श्री संजय येरमे यांच्या हस्ते झाले यावेळी शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आंबटवार यांच्यासह पंचायत समितचे श्री कनोजवार, श्री मलगिरवार, श्री चाटे उपस्थित होते. रविंद्रनाथ टागोर प्राथमिक शाळा कंधार येथील सातवीच्या विद्यार्थिनी अक्षरा टेंभुर्णेवार, लक्ष्मी मेकलवाड यांनी इस्रायल येथील बिगरमाती शेतीचा प्रयोग साकारला या प्रयोगाला शिक्षक व विद्यार्थ्यांनी दाद दिली, अधिकारी व परिक्षकांनीही या प्रयोगाचे कौतुक केले, या प्रयोगाचे उत्तम सादरीकरण अक्षरा टेंभुर्णेवार या विद्यार्थीनीने केले , ऐनवेळी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे तीने दिली.
या प्रयोगासाठी मार्गदर्शन मुख्याध्यापक श्री एस जी मुंडे, सहशिक्षीका श्रीमती मंजुषा यन्नावार, यांनी केले तर सहशिक्षक श्री सुर्यवंशी आर एच, श्रीमती शेख वाय आय, श्री हनुमंते व्हि डी यांनी मदत केली. या यशाबद्दल संस्थेचे सचिव श्री गंगाप्रसाद यन्नावार, शिक्षक संघटनेचे श्री राजहंस शहापुरे, पत्रकार दिगंबर वाघमारे, मुख्याध्यापक श्री भास्कर कळकेकर, श्री बसवेश्वर मंगनाळे यांनी अभिनंदन केले आहे.