कंधार ; प्रतिनिधी
सकल ओ. बी. सी. समाजाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन दि. २१ डिसेंबर २०२३ रोजी पासुन मौ. संगुचीवाडी ता. कंधार जि. नांदेड येथे करण्यात येत असल्याचे निवेदन रामचंद्र येईलवाड यांनी दि .१९ रोजी कंधार येथे तहसिलदार यांना दिले .
सध्या महाराष्ट्रा मध्ये मराठा समाजाची आरक्षणाची मागणी अनेक दिवसापासुन असुन आजपर्यत मराठा समाजासाठी वेगळे आरक्षण मागत होते व सर्वपक्षी नेते मंडळी व सरकारच्या वतीने ओ. बी. सी. आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ अशी चर्चा होत होती.
त्यावेळी सकल ओ. बी. सी. समाजाचा पाठिंबाच होता विरोध अजिबात नव्हता व आजही नाही फक्त सरकारने वेगळे आरक्षण दिल पाहिजे. परंतु मनोज जंरागे पाटील यांच्या भुमिका सरसकट मराठा समाजाला आरक्षण ओ. बी. सी. मधुनच घेणार या भुमिकेमुळे सकल ओ. बी. सी. समाजामध्ये स्वातंत्र्यानंतर ४२ वर्ष उशिरा ५२ टक्के ओ. बी. सींना फक्त २७ टक्के आरक्षण १९९२ नंतर मिळाले मंडळ कमिशन लागू करणा-या व्ही. पी. सिंग सरकारमुळे मिळालेले आहे. ते जबरदस्तीने हिस्कावुन घेण्याचा प्रयत्न होत आहे.
सरकाने न जुमानता ओ. बी. सी. आरक्षणास काडीचाही धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्यास आमची हरकत नाही.
म्हणुन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल ओ. बी. सी. समाजाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन दि. २१ डिसेबर २०२३ रोजी पासुन मौ. संगुचीवाडी ता. कंधार जि. नांदेड येथे सुरु करण्यात येत आहे . तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनावर रामचंद्र येईलवाड , प्रल्हाद घुगे , गोविंद कुंभारे , कैलास येईलवाड, शशिकांत येईलवाड , नागेश येईलवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .