नांदेड:(दि.१३ जानेवारी २०२४)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एन.सी. वर्दाचार्यलू यांचे १३ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता वयाच्या ८९ व्या वर्षी वार्धक्याने दुःखद निधन झाले आहे.
प्राचार्य एन.सी.वर्दाचार्यलू यांनी इ.स. १९७७ पासून १९९२ पर्यंत जवळपास एकूण पंधरा वर्षे यशवंत महाविद्यालयात प्राचार्य पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली.
यशवंत वरिष्ठ, कनिष्ठ महाविद्यालयिन प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना स्टाफ रूममध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, माजी प्राचार्य एन.सी.वर्दाचार्यलू यांची प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांबद्दल विशेष आपुलकी होती, तसेच मी स्वतः या महाविद्यालयात सरांमुळे सेवा प्रदान करीत आहे व माझ्या शैक्षणिक विकासाचे आधार सर आहेत; अशी भावना व्यक्त केली.
डॉ.शिवाजी शिंदे यांनी, माजी प्राचार्य एन.सी.वर्दाचार्यलू हे त्यांच्या संपर्कात असणाऱ्यांशी सदैव संवाद ठेवीत असत. समाजाशी, शैक्षणिक क्षेत्राशी निष्ठा व बांधिलकी असणाऱ्या अत्यंत बोटावर मोजता येणाऱ्या लोकांपैकी सर होते, असा भाव व्यक्त केला.
प्रा.कैलास दाड यांनी, माजी प्राचार्य एन.सी.वर्दाचार्यलू यांच्या महाविद्यालयीन आठवणींवर प्रकाश टाकला.
याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.अरविंद जोगदंड, डॉ.महेश कळंबकर,डॉ.श्रीरंग बोडके, डॉ.रामराज गावंडे, डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, डॉ.शिवराज बोकडे, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.संभाजी वर्ताळे,डॉ.विजय भोसले, डॉ.सुभाष जुन्ने,डॉ.संदीप खानसोळे,डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड,डॉ. अजय मुठे, डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ.संजय जगताप, डॉ.रत्नमाला मस्के, प्रा.माधव दुधाटे,डॉ.भरत कांबळे, डॉ.साईनाथ बिंदगे, डॉ.संदीप पाईकराव, डॉ.साईनाथ शाहू, प्रा.भारती सुवर्णकार, डॉ. एस.बी.वानखेडे, प्रा.पी.पी.सिसोदिया, प्रा.एस.एस.वाकोडे, प्रा.एम.एस. कनशेट्टे, प्रा.एस.ए.महिंद्रकर, प्रा.ज्ञानेश्वर पवार, प्रा.फाजगे,प्रा. मनीषा तांदळे, प्रा.मुकुंद धर्मले, व्ही.पी.सिंग ठाकूर, सौ.मनीषा बाचोटीकर आदी वरिष्ठ, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
********
शिक्षण क्षेत्रातील पितृतुल्य व्यक्तीमत्व गमावले! – अशोकराव चव्हाण
नांदेड, दि. १३ जानेवारी २०२४:
येथील यशवंत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य न. च. वरदाचार्यालु यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रातील पितृतुल्य व्यक्तीमत्व गमावल्याची भावना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
प्राचार्य न. च. वरदाचार्यालु यांच्या निधनाचे दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, नांदेड जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य त्यांनी केले. यशवंत महाविद्यालयाच्या गौरवशाली वाटचालीत त्यांचे सिंहाचे योगदान होते. या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांचे कुशल व्यवस्थापन दिसून आले. इंग्रजी विषयाचे ते गाढे अभ्यासक होते. नव्या जगाची भाषा म्हणून इंग्रजी बद्दल ग्रामीण भागात रुची वाढावी, यासाठी त्यांनी या विषयाच्या प्रसारासाठी मोठे काम केले.