Disaster.. ( हानी , नुकसान )

…. प्रिय सखी..
आज सकाळी ग्राउंडवर रनींग करत असताना आजच्या आर्टीकलचा विषय काय असावा असा विचार सुरु होता.. घरी आल्यावर मेसेंजरवर एका सखीचा मेसेज दिसला .. सचिनला वाचुन दाखवल्यावर तो म्हणाला , सोनल आज यावरच लिही..
जिने ( सखीने ) हा मेसेज केलाय तिची कृतज्ञता व्यक्त करते.. त्यांचं म्हणणं आहे माझ्यासारखी स्त्री समाजासाठी Disaster आहे.. सखी तुझा अजिबात राग आला नाही कारण नुकसान या शब्दाचा मी घेतलेला अर्थ तुला सांगते.. पन्नाशीतही मी रोज ८-१० राउंड पळते , तरुण मुलं प्रपोज करतात.. मी टाकलेल्या फोटोवर रील्सवर इतर स्त्रीयांपेक्षा खुप जास्त कमेंट येतात.. ज्या विषयावर कोणी घरातही बोलत नाही त्यावर मी लिहीते यामुळे कदाचित इतर स्त्रीयांची हानी होत असावी त्याबद्दल मनापासून माफीही मागते..

पण सखी सुंदर रहाण्याचा , दिसण्याचा हक्क प्रत्येकीला आहे ना.. मला अनेक मित्र आहेत यातही माझ्या स्वभावाचा वाटा असेल.. मी इतर स्त्रीपेक्षा वेगळ्या ॲंगल ने विचार करते म्हणुन ते माझ्याजवळ असावेत.. मी घरातील सगळी कामे स्वतः करते.. मेड आहे म्हणुन मिरवण्यापेक्षा माझा व्यायाम होतो हे माझ्यासाठी महत्वाचे आहे.. लोक काय म्हणतील यापेक्षा मला जसं हवय तसं मी जगते आणि ज्या विषयावर काम करायची गरज आहे त्यावर मी ज्ञान देण्याचं काम करते..
पण सखी खरं सांगु आज तुझ्यासारख्या विचार करणाऱ्या सख्या या जगात आहेत म्हणुन माझ्यासारख्या स्त्रीचं पारडं वर आहे..पुन्हा एकदा मला नवीन विषय दिल्याबद्दल आभार..

स्त्री स्त्रीचा शत्रू नसुन मित्र आहे हेच खरं .. कारण शब्दांचे अर्थ आपण घेउ तसे निघतात आणि त्या लेव्हलची विचारसरणी यायला शब्दच भाग पाडतात.. रोज शब्दात बागडणारी मी सगळ्याचा आदर करते .. हा मेसेज एका सखीने केला असला तरीही त्याचा पडसाद हा स्त्री मानसिकतेवर उमटतो आणि आपणच आपली किमत ठरवतो.. सखी प्रत्येक स्त्रीची जागा ही खुप वरची आहे गं तिला मातीमोल ठरवु नकोस कारण तु जे पेरणार आहेस तेच उगवणार आहे कारण संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या वेव्ज खेचतं आणि त्याच स्पीडने परत तुमच्यापर्यंत सोडतं.. त्यामुळे आपल्याला काय हवय त्यानुसार पेरणी करा म्हणजे तेच उगवेल..
आज या सखीने मला काय काय दिलं पहा.. वेगळ्या लेव्हल ला विचार करायची शक्ती दिली.. Disaster चा अर्थ नव्याने समजावला.. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची सखीच असते हे सांगितले आणि कायम पुरुषांमधे वावरणारी मी स्त्रीचा वेगळ्या ॲंगल ने विचार करायला लागले आणि ज्यांना मी सख्या म्हणते त्यांचा माझ्याबद्दल चा दृष्टिकोन कळला..
या जगात कोणीही आणि काहीही वाईट नाही असं मी कायम लिहीते त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे स्त्री..

तिळगुळ घ्या .. गोडगोड बोला म्हणताना आणि हळदीकुंकुला बोलवुन माझी साडी तुझ्यापेक्षा महाग आहे किवा माझ्याकडे इतक्या तोळ्याचं सोनं आहे यावर भर न देता सणाचं महत्व जाणुन घेउन सखीनो वैचारिक लेव्हल तिच्यापेक्षा माझी कशी मोठी ठेवता येइल याचा विचार केला तर नक्की प्रगती आहे..
सोच बदलो.. देश बदलेगा..

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *